Indian Citizen बनतायेत 'परदेशी नागरिक', दरवर्षी एक लाखाहून अधिक भारतीय...

Citizenship: गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांचा परदेशी नागरिकत्व घेण्याचा कल खूप वाढला आहे.
Indian Citizen
Indian Citizen Dainik Gomantak

Citizenship: गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांचा परदेशी नागरिकत्व घेण्याचा कल खूप वाढला आहे. उत्तम शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात गेलेल्या बहुतेकांनी आता तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1 लाख लोक भारत सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच देशाचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय नागरिकांनी परदेशी नागरिकत्व घेतल्याची आकडेवारी दिली होती, ती खरोखरच धक्कादायक होती.

परदेशी नागरिकत्व घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतेय

2015 मध्ये 1,41,000 लोकांनी परदेशी नागरिकत्व घेतले होते, तर 2016 मध्ये ही संख्या 144,000 च्या पुढे गेली होती. 2019 पर्यंत ही संख्या वाढतच गेली. 2020 मध्ये कोरोनामुळे हा आकडा थोडासा खाली आला असला तरी 2021 पासून हा आकडा पुन्हा 100000 च्या जवळपास गेला आहे. म्हणजेच, दररोज 350 हून अधिक भारतीयांना परदेशी नागरिकत्व (Citizenship) मिळत आहे.

Indian Citizen
Rishi Sunak: 'मी पंतप्रधान झालो तर...'; ऋषी सुनक यांनी ड्रॅगनला भरला दम!

हे सर्वात मोठे कारण

तज्ज्ञांच्या मते, उत्तम शिक्षण व्यवस्था, चांगल्या करिअरची हमी आणि आर्थिक समृद्धीच्या शोधात भारतीय नागरिक परदेशात जात आहेत. विशेष म्हणजे, तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थायिक होत आहेत. भारतात (India) नोकर्‍यांचा अभाव, चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा अभाव आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी व्यावसायिक वातावरणाचा अभाव ही स्थलांतराची प्रमुख कारणे असल्याचे अनेक शोधनिबंधांमधून समोर आले आहे.

Indian Citizen
भारतीय वंशाचे ऋषी सुनक इंग्रजांवर राज्य करणार? यूकेच्या पंतप्रधान मतदानात आघाडीवर

परदेशी नागरिकत्वासाठी प्राधान्य असलेला देश

2017 ते 2021 दरम्यान, 42% भारतीयांनी अमेरिकेला (America) पहिली पसंती दिली आहे. तर दुसरीकडे, कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे गेल्या 5 वर्षात 91,000 भारतीय लोकांनी नागरिकत्व मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) 86,000 लोकांसह तिसऱ्या स्थानावर आहे, 66,000 लोकांसह इंग्लंड आणि 23,000 लोकांसह इटली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com