जुनं ते सोनं! 7 लाखांच्या घरात सापडलं 2 कोटींचं घबाड

 The owner of an antique shop in Canada suddenly became rich
The owner of an antique shop in Canada suddenly became rich

कॅनडा: कॅनडामधील एका पुरातन दुकानातील मालक आचानक  श्रीमंत झाला. त्याला सुखद धक्का बसला आणि त्याने यू ट्यूब वर आपला हा अनूभव शेअर केला. त्यांने विकत घेतलेल्या घरामध्ये काही वस्तू, डिझाइनर कपडे, दुर्मिळ नाणी, सोन्या आणि हिराच्या अंगठ्या, रोकड भरलेली बॅग सापडली आहे. त्या बॅगमध्ये पर्ससह इतर काही गोष्टींचा समावेश आहे. अ‍ॅलेक्स आर्चबॉल्ड म्हणतो की, बेटे-जोएन रईस नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याने ही केली आणि त्यांना मालमत्ता विकण्यास विश्वास दिला. पुरातन व्यापाऱ्याचे असे म्हणणे आहे की, त्या घरात हा एवढा मोठा खजिना सापडेल याची त्याला कल्पना नव्हती.

एडमर्टनच्या दुकान क्युरोसिटी इंक चे मालक आर्चबॉल्डने दिवंगत याने  संगीत शिक्षक, बेटे-झोन आरएसी यांची मालमत्ता १०हजार डॉलर्समध्ये खरेदी केली होती. आपल्या स्टोअरसाठी, आर्चबोल्ड नियमितपणे जुन्या घरातील सामग्री खरेदी करतो आणि या सगळ्या शोधाचा व्हडिओ तो YouTube वर पब्लिश करत असते. तो म्हणाला की, 'पियानो आणि इतर गोष्टी पाहून मी 10 हजार डॉलर्समध्ये हे घर खरादी केले होते.  पण जेव्हा मी आत गेलो तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला या घरात अशा मौल्यवान वस्तू मला मिळतील याची कल्पना नव्हती. आर्चबॉल्ड म्हणतो की तो अनेक वर्षांपासून मी संगीत शिक्षकांना ओळखत होतो पण तो कधीच मला या घरात दिसला नाही." घराची चावी मिळताच ते अनपेक्षित खजिनांनी भरलेली वास्तू पाहून तो स्तब्ध झाला. 'घरात बरीच सामग्री साठवली गेली होती. मला माहित नव्हते की मी ज्या शिक्षकांना भेटलो तो एवढा श्रीमंत असेल." त्याने युट्यूबवर या सामग्रीतून मिळालेल्या वस्तूंचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सर्वात अविस्मरणीय शोधांपैकी एक म्हणजे, या घरात गादीच्या खाली लपवली असलेली एक चांदीची पट्टी. अर्चबॉल्ड आणि त्याच्या टीमला फर कोट्सने भरलेला एक रॅक सापडला, ज्यात चांदी आणि, 1920 व्या दशकातील पैसे आणि इतर वस्तू होत्या. ते म्हणाले की, 'ही शहरी दंतकथेसारखी ही गोष्ट झाली आहे. मी तिथे गेलो आणि त्याचा एक भाग झालो.' पुरातन डीलरचा अंदाज आहे की त्याच्याकडे सुमारे 400,000 (सुमारे दोन कोटी रुपये) हा खजीना आहे.

ते म्हणतात, 'आम्ही घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी १०,००० डॉलर्सची गुंतवणूक केली आणि त्यातून आम्ही 400,000 डॉलर्सची विक्री केली आहे,  असे म्हणायला हरकत नाही की हे सर्व साहित्य आणि तिजोरींच्या तीन लिलावानंतर, हे मी पाहिलेली सर्वात चांगली गुंतवणूक होती."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com