चक्क अंतराळात पाठवला भारतीय रेस्टॉरंच्या मालकाने समोसा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

ब्रिटनमधील लोकप्रिय चायवाला या नावाचं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या भारतीय मालकाने अंतराळात समोसा पाठवण्याचा तीनवेळा प्रयत्न केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळालं आहे.

लंडन: नेहमी अंतराळ संशोधन संस्था अंतराळात एखादे यान पाठवते ते प्रयोग करण्यासाठी नवी माहीती संशोधन करण्यासाठी कधी प्राणी तर कधी वस्तू पाठवतात. त्या वातावरणात गेल्यावर या वस्तूंवर काही परिणाम होतो का हे पाहण्यासाठी असे प्रयोग केले जातात. मात्र सध्या अंतराळात पाठवण्यात आलेला समोसा प्रचंड ट्रेंड होत आहे. याला कारणही असंच आहे. ब्रिटनमधील एका भारतीय रेस्टॉरंटने अंतराळात चक्क समोसाच पाठवला होता. पण अंतराळात पोहोचण्याआधीच तो फ्रान्समध्ये पडला होता. 

ब्रिटनमधील लोकप्रिय चायवाला या नावाचं रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटच्या भारतीय मालकाने अंतराळात समोसा पाठवण्याचा तीनवेळा प्रयत्न केला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळालं आहे.

चायवालाचे मालक नीरज यांचं म्हणणं आहे की, जगात आनंद पसरवण्याच्या उद्देशाने त्यांच्या मनात समोसा अंतराळात पाठवण्याचा विचार आला होता. एकदा मजेतच सर्वांना म्हटलं होतं की अंतराळात समोसे पाठवेन. निराशेच्या काळातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं एक कारण बनला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

चायवाला रेस्टॉरंटचे मालक नीरज यांनी समोसे पाठवण्यासाठी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला होता. तीनवेळा त्यांनी हा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा त्यांच्या हातातून हेलियमचा फुगा निसटला होता. दुसऱ्यावेळी फुग्यात पुरेसं हेलियम नव्हतं. तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात फुग्यासह समोसा अंतराळात सोडताना दिसून येत आहे.

संबंधित बातम्या