Oxgen Shortage: चीनने पुढे केला मदतीचा हात; भारताने मात्र...

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

भारताला सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत.

देशात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारताच्या आरोग्य व्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. अनेक ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय उपकरणामुळे अनेक कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजन (Oxygen) संपल्याचे फलक दिसू लागले आहेत. त्यामुळे वाढते कोरोना रुग्ण आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधा यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण दिवसेंदिवस अधिक वाढू लागला आहे. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने भारत सरकारने आखाती देश आणि सिंगापूरकडे (Singapore) मदतीचा हात मागितला आहे. मात्र शेजारी असणाऱ्या चीनने मदतीचा हात पुढे केला असतानाही भारत चीनकडून(China) मदत घेण्यास तयार नसल्याचं दिसत आहे. (Oxgen Shortage China came to the rescue but India)

‘’कोरोनामुळे भारतात (India) स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. कोरोना संसर्ग हा संपूर्ण जगाचा शत्रू आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक देशाने एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय एकतेबरोबर परस्पर मदतीची गरज आहे. भारताला सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत,’’ असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं.

लस पुरवठ्यावरुन अमेरिकेच्या फायझर कंपनीने भारताला घातली अट

गेल्यावर्षी भारताने चीनकडून वैद्यकीय उपकरणं मागवली होती. व्यवसायिक करार असल्यांच कारण पुढे करत ही उपकरणं मागवण्यात आली होती. भारत आणि चीन दोन्ही देश दक्षिण आशियामधील देशांना कोरोना लसींचा पुरवठा करत आहेत. त्यात नेपाळ आणि श्रीलंका या देशांनी भारताकडून लसींचा पुरवठा कमी झाल्यानंतर शेजारी असणाऱ्या चीनकडून मदत घेण्याचा विचार केला होता. भारताकडून या देशांना कोरोना लसींचा पुरवठा कमी होत असल्यामुळे आता चीन या देशांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे. बांग्लादेशनं 30 दशलक्ष कोरोना लसींसाठी भारताबरोबर करार केला होता. मात्र आता भारताकडून जानेवारीपासून 7 दशलक्ष कोरोना लसींचा पुरवठा बांग्लादेशला करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना लसींचा पुढील पुरवठा लवकारात लवकर यावा यासाठी बांग्लादेशकडून प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे बांग्लादेशची गरज गरज पाहता चीननं आपला मोर्चा बांग्लादेशकडे वळवल्याचं बोललं जात आहे.
 

संबंधित बातम्या