Pakistan: क्वेटामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात 3 ठार, 20 जखमी

स्फोटानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून स्फोटसंबंधी अधिक तपास करत आहेत.
Pakistan: क्वेटामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात 3 ठार, 20 जखमी
QuettaDainik Gomantak

पाकिस्तानमधील क्वेटा शहर (Quetta) आत्मघाती स्फोटाने पुन्हा एकदा हादरले आहे. हा स्फोट क्वेट्टा येथील चेकपोस्टवर झाला असून, त्यात तीन जण ठार आणि 20 जखमी झाले आहेत. स्फोटानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले असून स्फोटसंबंधी अधिक तपास करत आहेत. पाकिस्तानमधील प्रसिध्द वृत्तपत्र असणाऱ्या डॉनच्या अहवालानुसार, बलुचिस्तान काउंटर टेररिझम डिपार्टमेंटच्या (Balochistan Counter Terrorism Department) मस्तुंग रोडवरील सोहाना खान एफसी चेक पोस्टला हल्लेखोरांकडून निशाना करण्यात आला होता.

Quetta
Video: पाकिस्तान सीमेवर हजारो अफगाणी जमले, चेंगराचेंगरीत चार लोकांचा मृत्यू

दरम्यान, डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, सीटीडी टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. स्फोटानंतर लगेचच पोलीस, इतर यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना शेख जैद रुग्णालयात (Sheikh Zaid hospital) दाखल करण्यात आल्याची पोलिसांनी पुष्टी केली. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, आत्मघाती हल्लेखोराने चेक पोस्टवर तैनात असलेल्या डिपार्टमेंटच्या वाहनांनाची नासधूस केली. स्फोटानंतर लगेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून आजूबाजूच्या परिसरात हल्लेखोराने कुठे बॉम्ब ठेवला आहे का? याची पुष्टी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com