Pakistan: पाकिस्तानमध्ये 50 जणांचा बुडून मृत्यू

Sindhu river: दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ सदस्य आणि त्यांच्या नातेवाईकांचा बुडून मृत्यू
Pakistan
PakistanDainik Gomantak

Sindhu river: पाकिस्तानमधील रहीम यार खानपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या मचकेजवळ लोकांनी भरलेली बोट सिंधू नदीत उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 50 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या बोटीत 100 हून अधिक लोक होते असे सांगण्यात आले. काही लोक अजूनही बेपत्ता आहेत, बेपत्ता लोकांच्या जगण्याची शक्यता आता नगण्य आहे, असे पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाचे प्रवक्ते काशिफ निसार गिल म्हणाले की, घटनेला ४८ तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यामुळे कोणीही वाचण्याची शक्यता नाही. गिल म्हणाले की, वाचलेले बहुतेक पुरूष होते ज्यांना पोहता येत होते. सोमवारी लग्नाची वर्‍हाडी खोरे गावातून मचकेकडे दोन वेगवेगळ्या बोटीत परतत असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार "एक बोट ओव्हरलोड झाली आणि तिचा एक हुल पडल्यानंतर ती उलटली, या मध्ये कुटुंबातील बहुतेक महिला आणि मुले बुडाले.

Pakistan
Pakistan: या औषधाने शाहबाज सरकारची उडवली झोप; आत्महत्या वाढण्याचा धोका अधिक

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सुमारे आठ सदस्य आणि त्यांच्या नातेवाईकांचा बुडून मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह सिंधमधील मचकेजवळील हुसेन बक्श सोलंगी या त्यांच्या मूळ गावी वडिलोपार्जित स्मशानभूमीत पुरण्यात आले आहेत. वंशाचे प्रमुख सरदार अब्बास खान सोलंगी यांनी दोन मुले आणि एका महिलेसह 26 जणांना निरोप दिला.

Pakistan
Passport Ranking: या आशियाई देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली, जाणून भारताचे स्थान

सोलंगी यांनी सिंध आणि पंजाब सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली, कारण त्यांनी त्या भागात पूल बांधण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना दोषी ठरवले आणि लोकांना नदी पारकण्यासाठी जुन्या लाकडी बोटी वापरण्यास भाग पाडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com