चीनच्या मदतीने पाकिस्तानेही बनवली कोरोना लस 

khan 2.jpg
khan 2.jpg

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना जगातील अनेक देश लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. भारतासंह (India) अनेक देशांनी कोरोनावरील उपचारासाठी लसींची निर्मिती केली आहे. दरम्यान चीनच्या मदतीने पाकिस्तानने(Pakistan) देखील कोरोनाची लस बनवली आहे. ‘PakVac’ असे पाकिस्तानने बनवलेल्या लसीचे नाव आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी ''आम्ही कोरोना संकटातून बाहेर पडत आहोत. आम्ही मित्र देशांच्या मदतीने अडचणींना संधीमध्ये रुपांतरीत करण्याचे काम करत आहोत. आम्हाला कोरोनाच्या कठीण काळामध्ये चीन अगदी जवळचा मित्र देश वाटला आहे. ज्यामुळे कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी आम्हाला मदत झाली आहे,'' असे पाकिस्तानचे विशेष आरोग्य सहायक डॉ. फैसल सुल्तान  (Faisal Sultan)यांनी म्हटले आहे. (Pakistan also made corona vaccine with the help of China)

डॉ. फैसल पुढे म्हणाले, ''कोरोना लस बनवण्यासाठी आम्हाला मित्र देश असलेल्या चीनने कच्च्या मालाचा पुरवठा केला आहे. तरी देखील हे सोपे नव्हते. येणाऱ्या काळात लवकरच मोठ्याप्रमाणात कोरोना उपचारासाठी लस तयार केली जाईल.''  पाकिस्तानच्या नॅशनल अ‍ॅन्ड कमांड ऑपरेशन्स सेंटरचे प्रमुख असद उमर(Asad Omar) म्हणाले, ''हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच पाकिस्तानच्या  आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी या कोरोना लसींचा शुभारंभ केला. चीनच्या लसीला आपल्या देशात बरीच मोठी मागणी आहे. लोक देखील चीनी लसीला प्राधान्य देत आहेत. अ‍ॅस्ट्रॅाजेनेकासारखी (AstraZeneca) लसीला देखील डावललं जात आहे.''

मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये कोरोना लसीचा तुटवडा बघायला मिळाला होता. तसेच चीनी बनावटीच्या सिनोव्हॅक (Synovac) लसीचीही कमतरता होती. शहरांमध्ये कोरोनाची लस न मिळाल्यामुळे लोकांना घरी परतावे लागले. दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील तीन महिन्यांत पहिल्यांदाच पॉझिटिव्हिटी दर 40 टक्के च्या खाली आला आहे. गेल्या एका दिवसात पाकिस्तानमध्ये कोरोनाचे 1771 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत देशात कोरोनाचे 10 लाख कोरोना रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये कोरोना लसीची कमतरता बघायला मिळाली होती. दरम्यान पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com