पाकिस्तानलाही भारताशी शांततापूर्ण संबंध हवेत; इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींच्या पत्राला उत्तर

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा देत एक पत्र लिहिले होते. त्यानंतर  नरेंद्र मोदी यांच्या या पत्राला उत्तरादाखल इम्रान खान यांनीदेखील एक पत्र लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा देत एक पत्र लिहिले होते. त्यानंतर  नरेंद्र मोदी यांच्या या पत्राला उत्तरादाखल इम्रान खान यांनीदेखील एक पत्र लिहिले आहे. नरेंद्र मोदींच्या पत्राला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिवादन संदेशाबद्दल इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच, पाकिस्तानलाही भारताशी शांतता पूर्ण संबंध हवे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, त्यांनी या  पत्रात जम्मू काश्मीरसह दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. (Pakistan also wants peaceful relations with India; Imran Khan's reply to Narendra Modi's letter) 

किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरून गोव्यातील मच्छिमार संतप्त

पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरसह अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. पाकिस्तानलाही भारताशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत. यासह दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीरसह अनेक मुद्यांवर तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे. असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्यासाठी विधायक चर्चेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे आणि संवाद साधणे अत्यावश्यक असल्याचेही इम्रान खान यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानला भारतासह शेजारील सर्व राष्ट्रांशी शांततापूर्ण संबंध निर्माण करायचे आहेत. तसेच पाकिस्तान राष्ट्रीय दिन का साजरा केला? हे देखील त्यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे. 

No photo description available.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिलेल्या पत्रात शेजारी देशांमध्ये विश्वासाच्या नात्याची गरज असल्याच्या मुद्दयावर जोर दिला होता. भारताला पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत आणि त्यासाठी दहशतवादापासून मुक्त वातावरण आवश्यक आहे. तसेच, मानवतेच्या या कठीण काळात कोविड-19 महामारीत उद्भवलेल्या अनेक संकटाचा सामना करण्यासाठी देखील नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. 

मी पुन्हा येईन; स्मिथ अजूनही पाहतोय कॅप्टन्सीचं स्वप्न

नरेंद्र मोदी यांच्या पत्रापूर्वी इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी भारताशी संबंध सुधारण्याबाबत चर्चा केली होती. जानेवारी 2016 मध्ये पठाणकोट येथे पाक-दहशतवादी हल्ल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या सैन्यात  युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. 
संघर्षविराम झाला आहे, ज्यामुळे चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या