काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तान घेणार टर्कीची मदत

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पाकिस्तानला मदत करण्यासाठी टर्की एक योजना आखत आसल्य़ाचा दावा ग्रीसमधील काही प्रसारमाध्यमांनी केला आहे.

इस्तंबूल: पाकिस्तानचा काश्मीर खोऱ्यातील वाढता हस्तक्षेप चिंतेचा विषय बनला असताना आता पाकिस्तानला मदत करण्यासाठी टर्की एक योजना आखत आसल्य़ाचा दावा ग्रीसमधील काही प्रसारमाध्यमांनी केला आहे. भारताने जम्मू काश्मीरच्या संदर्भातील 370 हे विशेष दर्जा देणारे कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि या नारजीला तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एर्दोगन यांनी पाठिंबा दिला होता. पाकिस्तानला काश्मिरच्य़ा संबंधी मदत करण्यासाठी टर्कीचे अध्यक्ष तयिप एर्दोगन यांनी दहशतवाद्यांची तुकडी पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याच्या दृष्टीकोनातून ही दहशतवाद्यांची तुकडी पाठवली जात असल्याची शक्य़ता वर्तवण्यात येत आहे. एर्दोगन यांच्या लष्करी आधिकाऱ्यांनी मदत व्हावी यासाठी अमेरिकेत काम करत असणाऱ्या दहशतवादी संघटनांशी संपर्क साधला आहे. असेही प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे.

 पुलवामासारख्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलाने उधळला; जम्मू बसस्थानकातून 7 किलो...

ग्रीसमधील पेंटापोस्टाग्मा प्रसिद्ध वेबसाइटवर प्रकाशीत झालेल्या एका वृत्तानुसार टर्की पाकिस्तानला काश्मीरच्या संदर्भात मदत करण्यासाठी दहशतवाद्यांची एक तुकडी अर्थात (सादातची) पाठवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे. टर्की स्व:ता आशियामध्ये अधिक ताकदवर करण्यासाठी हे प्रयत्न करत आहे. त्य़ामुळे भारताच्य़ा विरोधात पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यात मदत करण्यासाठी ही दहशतवाद्यांची तुकडी पाठवत आहे. या अहवालात टर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी तुकडीची जबाबदारी सादात या लष्करी तुकडीकडे दिली आहे. काश्मिरमध्ये सादातचा तळ निर्माण करण्यासाठी सय्यद गुलाम नबी फई नावाच्या दहशतवाद्याची नियुक्ती केली आहे. फई हा पाकिस्तानच्या आयएसआयच्या पैशांच्य़ा मदतीने भारताविरोधात काश्मिर खोऱ्यात अशांतता पसरवण्याचे काम करत आहे. त्य़ाने यापूर्वी अमेरिकेत टक्स चोरीच्या प्रकरणात शिक्षाही भोगली होती.  

संबंधित बातम्या