पाकिस्तानचा मोठा निर्णय; 'वीज वाचवण्यासाठी' रात्री 8.30 नंतर बाजारपेठा बंद करण्याचे दिले निर्देश
PakistanDainik Gomantak

पाकिस्तानचा मोठा निर्णय; 'वीज वाचवण्यासाठी' रात्री 8.30 नंतर बाजारपेठा बंद करण्याचे दिले निर्देश

इस्लामाबाद शहरात रात्री 10 नंतर लग्नाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आणि रात्री 8:30 नंतर देशभरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान मध्ये वीजेचा तुटवडा असल्याने पाकिस्तानी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान (Pakistan) सरकारने इस्लामाबाद शहरात रात्री 10 नंतर लग्नाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आणि रात्री 8:30 नंतर देशभरातील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती देण्यात आली आहे. (Pakistan big decision Instructed to close markets after 8.30 pm to save electricity)

Pakistan
'ती'ने दिले 100 हून अधिक महिला,मुलांना ISIS साठी प्रशिक्षण

विजेच्या भीषण संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने विजेचा वापर कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली असून आता इस्लामाबादमध्ये रात्री 10 नंतर लग्न समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे जी 8 जूनपासून लागू होणार आहे.

सध्याच्या वीज संकटाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे, त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक परिषद (NEC) ने देशभरातील बाजारपेठा रात्री 8.30 वाजता बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

वीज संकटाबाबतचा हा निर्णय पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री वगळता सर्व प्रांतांचे मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला होता.

Pakistan
अफगाणिस्तानवर भूकबळीचं संकट; पोट भरण्यासाठी मुलांची मृत्यूशी झूंज

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, सिंध, पंजाब आणि बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी व्यापारी संघटनेशी सल्लामसलत करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. पत्रकारांना संबोधित करताना उर्जा मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले की बाजार लवकर बंद करणे आणि घरातूनच काम केल्याने विजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

"देशात वीज निर्मिती 22,000 मेगावॅट आहे आणि गरज 26,000 मेगावॅट एवढी आहे," असे मंत्री म्हणाले. पुढे ते म्हणाले की, देशात सुमारे चार हजार मेगावॅटचा तुटवडा जाणवून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com