पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच

गोमंतक वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले आहे.

पॅरिस : इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले असून आणखी खूप काही करण्याची गरज असल्याचेही सुनावले.

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटना पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत. पाकिस्तान त्यांना अद्याप रोखू शकला नाही. जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला दहशतवादी मसूद अजहर तसेच 2008 च्या मुंबई हल्ल्यातील  साजिद मिर यासारख्या दहशतवाद्यांवर पाक सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, काही काळातच पाकचा काळ्या यादीत समावेश होऊ शकतो.

संबंधित बातम्या