Pakistan Economic Crisis: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर PAK, जनक्षोभ; चिकन-800 टोमॅटो-200 ₹ एक किलो

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंतच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Pakistan Crisis
Pakistan CrisisDainik Gomantak

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. खाद्यपदार्थांपासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंतच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने हैराण झालेली जनता रस्त्यावर उतरली आहे.

शाहबाज शरीफ सरकारने गेल्या काही दिवसांत विजेचे दर वाढवून त्रासलेल्या जनतेला झटका दिला होता.

दरम्यान, देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. महागाईची स्थिती अशी आहे की, चीकनचा दर 700 ते 800 रुपये किलोवर पोहोचला आहे.

तर, टोमॅटो 160 ते 200 रुपये किलो दराने विकले जात आहे. दुधाची किंमत 190 पाकिस्तानी रुपयांवरुन 210 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे.

Pakistan Crisis
Pakistan Economic Crisis: सरकार हतबल जनता वाऱ्यावर... पाकिस्तानमध्ये महागाईमुळे नागरिकांचे बुरे हाल

परकीय चलनाचा साठा संपण्याच्या मार्गावर!

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानचा (Pakistan) परकीय चलनाचा साठा 3 अब्ज डॉलरपेक्षा कमी राहिला आहे. कराची मिल्क रिटेलर्स असोसिएशनचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, काही दुकानदारांनी दुधाच्या दरात प्रति लिटर 27 रुपयांनी वाढ केली आहे.

आगामी काळात दुधाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या धान्याच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. 50 किलो धान्याच्या पोत्याची किंमत 7,200 रुपये झाली आहे.

आणि जनतेच्या समस्या वाढतील!

आगामी काळात पाकिस्तानी जनतेच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. आयएमएफकडून कर्जाच्या अटींमध्ये सबसिडी संपुष्टात आणण्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानने जनतेला दिलेली सबसिडी कमी करुन महसूल वाढवावा, असे आयएमएफने (IMF) आपल्या अटींमध्ये म्हटले आहे. आयएमएफचा भर शाश्वत महसूल उपायांवर आहे. यामध्ये जीएसटी 17 वरुन 18 टक्क्यांपर्यंत वाढवणे, पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लागू करणे आदी उपायांचा समावेश आहे.

Pakistan Crisis
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची शेवटची इच्छाही अपूर्णच, IMF कडून मदतीस नकार

संरक्षण बजेटमध्ये कपात सुचवली

यासोबतच सूत्रांनी दावा केला आहे की, संरक्षण बजेटमध्ये 10-15 टक्के कपात करण्याच्या IMFच्या अटीबाबत पाकिस्तान सरकारने संरक्षण मंत्रालयाशी चर्चा केली.

लष्कराच्या जनरल हेडक्वार्टरच्या (जीएचक्यू) सूचनेला उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, गैर-लढाऊ बजेटमध्ये केवळ 5-10 टक्के कपात केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com