Pakistan Flood: मुसळधार पावसामुळे बलुचिस्तानच्या पुरात 127 लोकांचा मृत्यू

Balochistan Flood: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे
Pakistan Flood
Pakistan FloodDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये (Pakistan) आलेल्या पुरामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. बलुचिस्तानमधील पुरामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे जनतेचेही आर्थिक नुकसान झाले असून ते कमी करण्यासाठी अनेकजण उरलेल्या वस्तू घेण्यासाठी घराजवळ पोहोचत आहेत. अचानक आलेल्या या पुरामुळे हेलिकॉप्टर आणि बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. (Pakistan Flood News)

पाकिस्तान एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने सांगितले की सैन्य बचाव कार्य, वैद्यकीय शिबिरे उभारणे आणि खराब झालेल्या दळणवळण सेवा दुरुस्त करण्यात गुंतले आहे. यासोबतच तयार केलेले अन्नही लोकांना दिले जात आहे.

* पुरामुळे किती नुकसान झाले?

एआरवाय न्यूजने पीडीएमए (प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) च्या हवाल्याने म्हटले आहे की बलुचिस्तानमधील सात धरणे तुटली आणि अनेकांना पूर आला. बलुचिस्तानमध्येच पुरामुळे 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानमध्ये 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पूल आणि महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

Pakistan Flood
Canada Supreme Court:'पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढणे गुन्हा', कॅनडा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी शनिवारी पूरग्रस्त बलुचिस्तानला भेट दिली. याबाबत माहिती देताना पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनी ट्विट (Tweet) करून नुकसान भरपाईची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, पुरात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि विस्थापित लोकांसाठी आर्थिक मदत वाढवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com