पुरामुळे पाकिस्तानात १६ जणांचा बळी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

स्वात जिल्ह्यात घरात पाणी शिरल्याने शाहग्राम आणि तिरट येथे सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले.

पेशावर: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा जिल्ह्यात महापुरामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन मुले आणि महिलांचा समावेश आहे. महापुरामुळे गुरुवारी उपर कोहिस्तान येथे ८, स्वात येथे ६ आणि शांघला जिल्ह्यातील २ जण मृत्युमुखी पडले. याशिवाय चाळीस घरांची पडझड झाल्याचे प्रांतिय आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले. 

स्वात जिल्ह्यात घरात पाणी शिरल्याने शाहग्राम आणि तिरट येथे सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले. प्रांताचे मुख्यमंत्री के. पी. मेहबुब खान यांनी या घटनेबद्धल शोक व्यक्त केला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या