पाकिस्तानचा 'दुतोंडी' चेहरा, दहशतवादी संघटनांना देशात खतपाणी

हक्कानी नेटवर्क आणि इस्लामिक स्टेट-खोरासान (IS-K) सारख्या दहशतवादी संघटनांसोबत भागीदारी करून लष्कर-ए-तैयबा आपला पाया मजबूत करत असल्याची धक्कदायक माहिती देखील समोर येत आहे
पाकिस्तानचा 'दुतोंडी' चेहरा, दहशतवादी संघटनांना देशात खतपाणी
Pakistan helping terrorist organization like Lashkar-e-Taiba in country Dainik Gomantak

दहशतवादाचा सूत्रधार असलेला पाकिस्तान (Pakistan) केवळ लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या आंतरराष्ट्रीय बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेलाच (Terrorist Organization) संरक्षण देत नाही, तर खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) नवीन तळ उभारण्यात आणि दहशतवाद्यांची भरती करण्यातही मदत करत आहे अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर या तळांवर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण अव्याहतपणे सुरू आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार , पाकिस्तान जरी या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात दहशतवादी भरतीचे (India) प्रमाण अनेक पटींनी वाढले असून पाकिस्तानच याला जबाबीदार असल्याचे माहिती या वृत्तपत्राने दिली आहे. (Pakistan helping terrorist organization like Lashkar-e-Taiba in country)

Pakistan helping terrorist organization like Lashkar-e-Taiba in country
तालिबान्यांचा महिला द्वेष, आता कठोर मीडिया मार्गदर्शक तत्त्वांमुळे 'जाच'

हक्कानी नेटवर्क आणि इस्लामिक स्टेट-खोरासान (IS-K) सारख्या दहशतवादी संघटनांसोबत भागीदारी करून लष्कर-ए-तैयबा आपला पाया मजबूत करत असल्याची धक्कदायक माहिती देखील समोर येत आहे. अफगाणिस्तानात तालिबानला बळ देण्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या नेतृत्वाचा वापर करत आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यात लष्कर-ए-तैयबाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लष्कर आणि तालिबान या दोघांनाही पाकिस्तानचे संरक्षण मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे दहशतवादी संघटनेला अफगाणिस्तानात आपली मुळे मजबूत करणे सोपे होत आहे.

मे 2018 मध्ये, UN वॉचडॉग गटाने म्हटले होते की लष्कर पाकिस्तानमधील मदरशांमधून भरती करत आहे, ज्यांना अफगाणिस्तानच्या कुनार आणि नांगरहार प्रांतांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.2008 च्या मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा हात होता. त्यामुळे या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला आहे. याउलट लष्कराचे दहशतवादीही पाकिस्तानी लष्कराला मदत करतात. तालिबानचा अफगाणिस्तानवरील ताबा हे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी धोरणाचे अपयश असल्याचे धोरणात्मक निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com