Pakistan: धर्मांतर-अपहरण अन् अल्पवयीन मुलींच्या विवाहावरुन हिंदूंचा संताप; जगाला सांगणार...

Pakistan News: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू धर्मांतर, अपहरण आणि अल्पवयीन मुलांचे लग्न या वाढत्या घटनांमुळे कंटाळले आहेत.
Hindu
HinduDainik Gomantak

Pakistan: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू धर्मांतर, अपहरण आणि अल्पवयीन मुलांचे लग्न या वाढत्या घटनांमुळे कंटाळले आहेत. हिंदूंच्या बाजूने या महिन्याच्या अखेरीस मोठा मोर्चा काढण्याची तयारी आहे. हे लोक कराचीतील सिंध विधानसभेच्या इमारतीबाहेर जमतील.

सिंध प्रांतातील अनेक हिंदू समाजाच्या नेत्यांच्या वतीने 30 मार्च रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे. देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पाकिस्तान दरावर इत्तेहाद (पीडीआय) या संघटनेच्या बॅनरखाली हे आयोजन करण्यात येणार आहे.

यासंदर्भात संस्थेने सोशल मीडियावर (Social Media) अनेक पोस्टर्स जारी केले आहेत. अपहरण, सक्तीचे धर्मांतर, अल्पवयीन मुलींचे विवाह आणि सिंध प्रांतातील हिंदू समुदायाच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्याच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात येत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Hindu
Pakistan: आर्थिक संकटावर मात करण्यासाठी शहबाज सरकारची युक्ती; सैन्याच्या परेडवर...

पीडीआयचे अध्यक्ष फकीर शिवा कुची म्हणाले की, "आम्ही हिंदू समाजातील हजारो लोक रॅलीत सहभागी होतील अशी अपेक्षा करत आहोत, कारण सरकारने (Government) आमच्या महिला आणि मुलींचे अपहरण, जबरदस्तीने केलेले धर्मांतर आणि बनावट विवाहाकडे डोळेझाक केली आहे."

विधानसभेत रखडलेले विधेयक मंजूर करण्याची मागणी

शिवा कुची पुढे म्हणाले की, 'संघटनेने जनजागृतीसाठी प्रांतभर रॅली काढण्यास सुरुवात केली आहे.'

30 मार्च रोजी जेव्हा ही निषेध रॅली आयोजित केली जाईल, तेव्हा देशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना भेडसावणाऱ्या समस्या प्रत्येकाने पाहाव्यात, असे ते म्हणाले. कुची म्हणाले की, त्यांनी सिंध विधानसभेत सक्तीचे धर्मांतर आणि विवाहाविरुद्ध प्रलंबित विधेयक मंजूर करावे अशी मागणी केली आहे.

Hindu
Pakistan: 'आयएसआय प्रमुख मनोरुग्ण, माझ्याविरोधात कट रचणारा...', इम्रान खान पुन्हा भडकले

अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करुन त्रास दिला

2019 मध्ये, सिंध प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा सिंध विधानसभेत उपस्थित झाला होता.

हा प्रस्ताव केवळ हिंदू मुलींपुरता मर्यादित ठेवू नये, अशा काही आमदारांच्या आक्षेपावर दुरुस्ती करुन एक प्रस्ताव चर्चेला आला आणि एकमताने मंजूर करण्यात आला.

मात्र, नंतर सक्तीच्या धर्मांतराला गुन्हेगार ठरवणारे विधेयक विधानसभेत फेटाळण्यात आले. तत्सम विधेयक पुन्हा प्रस्तावित करण्यात आले, परंतु 2021 मध्ये ते नाकारण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com