Pakistan: पंजाबनंतर कराची विद्यापीठात हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, होळी खेळण्यासाठी...

Karachi University: पाकिस्तानमध्ये होळीच्या मुहूर्तावर हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
Karachi University
Karachi UniversityDainik Gomantak

Pakistan News: पाकिस्तानमध्ये होळीच्या मुहूर्तावर हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब विद्यापीठानंतर आता कराची विद्यापीठातही होळी खेळल्याबद्दल हिंदू विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, होळी सणाचे आयोजन करणार्‍या विद्यार्थ्यांनी सांगितले की, ते सिंधी विभागाचे आहेत आणि त्यांनी आयोजित केलेल्या सणासाठी त्यांचा छळ करण्यात आला.

'अनेक मुलं येऊन थांबली'

एका वृत्तानुसार, त्यांनी आरोप केला की, आम्ही होळी साजरी करत असताना इस्लामी जमियत-ए-तलाबा (IJT) मधील अनेक मुले आली आणि आम्हाला थांबवले. त्यांनी आम्हाला आणि इतर विद्यार्थ्यांना मारहाण केली.

व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये या विधानाची पुष्टी करताना एका विद्यार्थिनीने सांगितले की, ती आणि तिचे वर्गमित्र होळी साजरी करत असताना, आयजेटी सदस्यांनी येऊन त्यांचा छळ केला आणि पुरुष विद्यार्थ्यांना (Students) मारहाण केली.

Karachi University
Pakistan Economic Crisis: कर्ज द्या नाहीतर...! दिवाळखोर पाकिस्तानची जगाला हाक

प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश

याशिवाय, सिंध विद्यापीठाचे मंत्री इस्माईल राहू यांनी या घटनेची दखल घेतली. कराची विद्यापीठाचे कुलगुरु खालिद महमूद इराकी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. विद्यापीठ प्रशासनाने चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करावा, असे इस्माईल यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, 'हिंदू विद्यार्थ्यांना विद्यापीठात त्यांचे सण साजरे करण्याची पूर्ण परवानगी आहे आणि त्यांना कोणीही रोखू शकत नाही. आपला धर्म आणि कायदा सर्व धर्म आणि श्रद्धांचा आदर करण्यास शिकवतो आणि लोकांना त्यांचे सण साजरे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो.'

Karachi University
Pakistan Cricketer: 'या' पाकिस्तानी स्टार क्रिकेटरच्या घरी चोरी, लाखोंचा माल केला लंपास

घटनेचा काहीही संबंध नाही: आयजेटी

मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा आयजेटीने केला आहे. आयजेटीचे प्रवक्ते बासिक नईम यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मारहाणीत विद्यार्थी संघटना सहभागी नाही. ते म्हणाले की, आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो.

Karachi University
Pakistan Economic Crisis: रशियाने दाखवला पाकिस्तानवर अविश्वास; कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ठेवली अट

पंजाब विद्यापीठात यापूर्वी हल्ला झाला होता

याआधी, लाहोरमधील पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये होळी साजरी केल्याबद्दल हिंदू समुदायाच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते.

या हल्ल्यात हिंदू धर्मातील 15 विद्यार्थी जखमी झाले असून, त्याविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या परवानगीने होळी साजरी करत असताना पंजाब विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसमध्ये सोमवारी आयजेटी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यावर हल्ला केला.

रिपोर्टनुसार, काही इतर व्हिडिओंमध्ये सुरक्षा रक्षक विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत होते, जे घटनास्थळावरुन पळून जाताना दिसत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com