पाकिस्तानचं पुन्हा दहशतवादी प्रेम, 100 अतिरेक्यांची जेलमधून सुटका

सध्या टीटीपीची कोणतीही मागणी किंवा अट मान्य करण्यात आलेली नाही. पाकिस्तान सरकार आणि टीटीपी यांच्यात 9 नोव्हेंबरपासून शांतता चर्चा सुरू आहे.
पाकिस्तानचं पुन्हा दहशतवादी प्रेम, 100 अतिरेक्यांची जेलमधून सुटका
Pakistan Imran government release 100 terrorists from Tehrik i Taliban group Dainik Gomantak

पाकिस्तानचे (Pakistan) दहशतवादी प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलेले दिसत आहे, कारण पाकिस्तानने तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehrik-i-Taliban Pakistan) या दहशतवादी संघटनेसमोर गुडघे टेकून पाकिस्तानच्या इम्रान (Imran Khan) सरकारने 100हून अधिक दहशतवाद्यांची सुटका केली आहे. एक वृत्तपत्राने सरकारी अधिकार्‍यांचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, सरकारने स्थापन केलेल्या बंदी शिबिरांमध्ये बहुतेक टीटीपी कैदी समाजाच्या मुख्य प्रवाहात परत येण्याच्या प्रक्रियेतून जात आहेत.(Pakistan Imran government release 100 terrorists from Tehrik i Taliban group)

तथापि, अहवालानुसार त्यापैकी बहुतेकांनी अनिवार्य सहा महिन्यांचा अटक कालावधी देखील पूर्ण केला नव्हता. पाकिस्तानी दैनिकानुसार, अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की कैद्यांची सद्भावना म्हणून सुटका करण्यात आली आहे. सध्या टीटीपीची कोणतीही मागणी किंवा अट मान्य करण्यात आलेली नाही. पाकिस्तान सरकार आणि टीटीपी यांच्यात 9 नोव्हेंबरपासून शांतता चर्चा सुरू आहे. टीटीपीने अफगाणिस्तानमध्ये दोन्ही बाजूंच्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर युद्धविराम जाहीर केला आहे.

मात्र, इम्रान सरकारच्या या कारनाम्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा गृहकलह मजला आहे आहे कारण इम्रान खान यांच्या या कृत्यामुळे विरोधक चांगलेच संतापले आहेत. दुसरीकडे अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि देशांतर्गत आघाडीवर विखुरलेली पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशला अस्थिर करण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न करत आहे. 1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळे झालेल्या बांगलादेशात आयएसआयने इस्लामिक दहशतवादाची मुळे मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.

Pakistan Imran government release 100 terrorists from Tehrik i Taliban group
पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मदतीने बांगलादेशला अस्थिर करतंय

बांगलादेश लाइव्ह न्यूजने लष्कर-ए-तैयबाच्या भूमिकेवर मंत्री हसन उल-इनूच्या हवाल्याने म्हटले आहे की, “पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या पैलूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बांग्लादेशातील दहशतवाद आणि पाकिस्तानकडून मिळणारी मदत 2016 मध्ये सार्वजनिक झाली जेव्हा ढाक्याच्या होली आर्टिसन बेकरीवर हल्ला झाला. यामध्ये पाच परदेशींसह २० जणांचा मृत्यू झाला होता.

तर दुसरीकडे जेएमबी आणि लष्कर-ए-तैयबाने बांगलादेशातील टेकनाफ आणि बंदरबनच्या दुर्गम भागात राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. याआधी, म्यानमारचे माजी राष्ट्राध्यक्ष हटिन क्याव यांनी देशाच्या सीमा चौक्यांवर झालेल्या हल्ल्यांसाठी रोहिंग्या दहशतवादी गट उर्फ ​​मुल मुजाहिदीन (एएमएम) ला जबाबदार धरले होते. अहवालात म्हटले आहे की बांग्लादेशस्थित एएमएम हरकत-उल-जिहाद इस्लामी-अरकानमधून उद्भवला आहे, ज्याचे लष्कर आणि पाकिस्तान तालिबानशी जवळचे संबंध आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com