पाकिस्तानी मंत्र्याचा इम्रान खानवर हल्लाबोल, 'पत्रकारांचे अपहरण करुन...'

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पत्रकारांचे घरातून जबरदस्तीने अपहरण करून त्यांचे कार्यक्रम बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पाकिस्तानी मंत्र्याचा इम्रान खानवर हल्लाबोल, 'पत्रकारांचे अपहरण करुन...'
PakistanDainik Gomantak

पाकिस्तानच्या (Pakistan) माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर पत्रकारांचे घरातून जबरदस्तीने अपहरण करून त्यांचे कार्यक्रम बंद पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी रविवारी लाहोर प्रेस क्लबमधील भाषणात इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडलं. (Pakistan Information and Broadcasting Minister Maryam Aurangzeb has attacked Imran Khan)

Pakistan
Sri Lanka Crisis: कोलंबोमध्ये हिंसक संघर्षानंतर संचारबंदी लागू, 20 जण जखमी

इम्रान खान यांनी आपल्या सरकारचे अपयश लपवण्यासाठी जबरदस्तीने फतवा जारी केल्याची टीका मरियम यांनी केली आहे. माजी पंतप्रधानांच्या कार्यकाळावर टीका करण्यासोबतच माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणाले की, सध्याचे सरकार वृत्तपत्रांवर विश्वास ठेवते. त्यांच्या सर्व समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी पत्रकारांना यावेळी दिले. त्यांचे सरकार लोकशाहीवर विश्वास ठेवतात आणि ती टिकवण्यासाठी काम करणाऱ्या सर्व पत्रकारांचा आदर करतात, असेही ते म्हणाले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काम करणाऱ्या या सर्व पत्रकारांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी आपल्या भाषणादरम्यान प्रेस क्लबची भूमिका 'सकारात्मक आणि प्रभावशाली' असल्याचे सांगितले. औरंगजेबने इम्रान खानच्या नेतृत्वाखालील तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ला 20 मे रोजी लाँग मार्चमध्ये कोणताही गोंधळ न करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्चच्या नावाखाली जर पीटीआय वातावरण बिघडवण्याचा विचार करत असेल, तर सरकार त्यांना रोखण्यासाठी सर्व मार्ग अवलंबेल, असे त्यांनी या घोषणेवेळी म्हटले आहे.

Pakistan
गृहयुद्ध भडकावणे थांबवा, अन्यथा...: पंतप्रधान शाहबाज यांचा इम्रान खान इशारा

मरियमचे हे वक्तव्य माजी गृहमंत्री शेख रशीद यांच्या विधानाला उत्तर म्हणून देण्यात आले आहे ज्यात त्यांनी पीटीआयच्या लाँग मार्च दरम्यान रक्तपात होण्याची शक्यता देखील व्यक्त केली होती. पीटीआयच्या या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न झाल्यास देशात मोठा गदारोळ होऊ शकतो, असे देखील माजी मंत्र्याने आपल्या वक्तव्यात म्हटले होते. दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी शनिवारी सांगितले की, माजी मंत्री शेख रशीद अहमद यांनी लाँग मार्चला खुनी संबोधलेलं ते त्यांचं विधान मागे न घेतल्यास मी त्यांना घरी जाण्याची परवाणगी देणार नाही.

स्थानिक मीडियानुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान 20 मे रोजी इस्लामाबादमध्ये आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी अबोटाबादमध्ये एका राजकीय सभेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले होते की, "मला विश्वास आहे की 20 मे रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या रॅलीत तीस लाखांहून अधिक लोक सहभागी होतील."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.