पाकिस्तान साऱ्या जगासाठी डोकेदुखी, भाजप नेत्याची अमेरिकेत चपराक

माधव यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले की, 'जागतिक समुदायाने जागतिक दहशतवादाच्या केंद्रस्थानाशी सामना करणे आवश्यक आहे.
पाकिस्तान साऱ्या जगासाठी डोकेदुखी, भाजप नेत्याची अमेरिकेत चपराक
Pakistan is headache for all world says BJP leader Ram Madhav on terrorism issueDainik Gomantak

दहशतवाद्यांचे (Terrorists) सुरक्षित आश्रयस्थान असलेला पाकिस्तान (Pakistan) संपूर्ण जगासाठी डोकेदुखी आहे कारण जगभरातील सर्व मोठे दहशतवादी अड्डे याच देशात आहेत.असे सांगत भाजप नेते राम माधव (Ram Madhav) यांनी अमेरिकेत पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. 'जागतिक दहशतवाद विरोधी दिन' साजरा करण्यासाठी भारतीय-अमेरिकनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात रॅम माधव बोलत होते. (Pakistan is headache for all world says BJP leader Ram Madhav on terrorism issue)

माधव यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले की, 'जागतिक समुदायाने जागतिक दहशतवादाच्या केंद्रस्थानाशी सामना करणे आवश्यक आहे. असे सांगतच त्यांनी 'लक्षात ठेवा पाकिस्तान ही केवळ भारतासाठी डोकेदुखी नाही. संपूर्ण जगासाठी ही डोकेदुखी आहे. तुम्ही पाकिस्तानसाठी लहान मुलासारखे वागू शकत नाही असा इशारा देखील संपूर्ण जगाला दिला आहे. जगातील सर्व मोठ्या दहशतवादी घटनांच्या खुणा पाकिस्तानात असून पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रायोजक, प्रोत्साहन, निधी, संरक्षण देणारा देश दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान आसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारताने दहशतवादाचा पराभव केला आहे.

Pakistan is headache for all world says BJP leader Ram Madhav on terrorism issue
'हिंदुत्व विचारसरणी' म्हणजे शांततेला धोका, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचं विधान

त्यांनी दावा केला की वॉशिंग्टन डीसीमधील बुद्धिजीवींचा एक गट पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था ISI च्या बचावात व्यस्त आहे.मात्र ISI दहशतवादी आहेत. पण त्यांनी यशस्वीपणे काही अमेरिकन विचारवंतांना पटवून दिले आहे की ते खूप प्रयत्न करत आहेत, पण हे दहशतवादी गट त्यांच्या ताब्यात येत नाहीत.आणि या खोट्या नाटकांमुळेच त्यांना अमेरिकेतून मदत जात आहे. शेवटच्या दहशतवाद्याचा खात्मा केल्याशिवाय जगातील दहशतवादाविरुद्धची लढाई यशस्वी होणार नाही, असे मत माधव यांनी व्यक्त करतानाच

त्याच बरोबर दहशतवाद या मुद्द्यावर बोलताना आम्ही भारतात दहशतवादाचा पराभव केला आहे. काश्मीरमध्ये इकडे-तिकडे दहशतवादी आहेत असे तुम्ही म्हणू शकता, पण आज भारतातील दहशतवाद गुन्हेगारांना चांगलाच महागात पडला आहे. जे काही उरले आहे, ते लवकरच आम्ही संपवू असा दावा देखील रॅम माधव यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com