पाकिस्तानच्या 65 वर्षांच्या मौलानाने केला 14 वर्षीय मुलीशी निकाह

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

जगभरात बालविवाहाविरोधात आवाज उठविला जात असताना पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे 62 वर्षीय खासदार मौलाना सलाहउद्दीन आयुबी यांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे.

इस्लामाबाद: जगभरात बालविवाहाविरोधात आवाज उठविला जात असताना पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे 62 वर्षीय खासदार मौलाना सलाहउद्दीन आयुबी यांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी लग्न केले आहे. सरकारने पोलिसांना तपासणीचे आदेश दिले आहेत. सलाहुद्दीन बलुचिस्तानमधील चित्रालचे खासदार आहेत. ही मुलगी एका सरकारी कन्या शाळेची विद्यार्थिनी होती. एका स्वयंसेवी संस्थेने या लग्नाची माहिती दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलीच्या जन्म प्रमाणपत्रातून प्रकरण उघड

मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या शाळेने तिचे जन्म प्रमाणपत्र माध्यमांसमोर सादर केला. त्यात तिची जन्मतारीख 28 ऑक्टोबर 2006 अशी आहे. त्यानंतर एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने पोलिसांत तक्रार दाखल केली. शाळेकडून मिळालेल्या माहितावरून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

वडिलांनी नाकारले मुलीचे लग्न

जेव्हा तक्रार मिळाल्यावर स्थानिक पोलिस मुलीच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या वडिलांनी आपल्याच मुलीचे झालेले लग्न चक्क नाकारले. माझ्या मुलीचे मुळीच लग्न झाले नाही. असे वडिलांनी सांगितले. तर दुसरीकडे मुलीच्या वडिलांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, आम्ही आपल्या मुलीला त्या खासदाराकडे पाठवणार नाही. असे पोलिसांनी सांगितले.

पाकिस्तानी कायद्यात लग्नाचे वय 16

पाकिस्तानी कायद्यानुसार इथे मुलींचे लग्नाचे वय 16 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. जर या पेक्षा कमी वयात लग्न झाले असेल तर कायदेशीररित्या तो गुन्हा मानला जावू शकतो आणि शिक्षा होऊ शकते.

जर्मनीत झालेल्या शेतकरी आंदोलनात फडकविले पाकिस्तानी झेंडे; बीजेपीने केला कॉग्रेसवर आरोप 

 

 

संबंधित बातम्या