'तुम्ही कर भरावा, जेणेकरुन देश चालेल': इम्रान खान

इम्रान खान (Imran Khan) पुढे म्हणाले, तुम्हाला कर भरावा लागेल, जेणेकरुन आम्ही पायाभूत सुविधा सुधारु शकू.
'तुम्ही कर भरावा, जेणेकरुन देश चालेल': इम्रान खान
Imran KhanDainik Gomantak

पाकिस्तान (Pakistan) कोरोना संकटात काहीसा सावरत असतानाच दुसरीकडे मात्र देशाची अर्थव्यवस्था चांगलीच रसातळाला गेली आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारवर विरोधकांसह पाकिस्तानी जनतेचा दबाव वाढत आहे. यातच आता पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानी जनतेला एक विनंती केली आहे. राजधानी इस्लामाबादमधील (Islamabad) एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना, देशाला समृध्द आणि आनंदी पाहायचे असेल तर कर भरावा लागेल असे आवाहन केले. इम्रान खान पुढे म्हणाले, तुम्हाला कर भरावा लागेल, जेणेकरुन आम्ही पायाभूत सुविधा (Infrastructure) सुधारु शकू. याद्वारे शिक्षण, आरोग्य, चांगले रस्ते, वीज या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतील.

Imran Khan
"भारत-पाकिस्तान सीमेवर लढा,आम्हाला दूर ठेवा'' तालिबानचं मोठं वक्तव्य

दरम्यान, लोक कर भरत नाहीत आणि नंतर मात्र सुविधांची मागणी करतात या गोष्टीबद्दल इम्रान खान यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, असे लोक एकही चांगले काम करु शकत नाहीत, परंतु त्यांना स्वर्गसुखे पाहिजे असतात. जनतेने कर भरावा, जेणेकरुन देशाची संपत्ती वाढेल. बांधकाम क्षेत्राची कार्यपद्धती सुधारण्याच्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल बोलताना इम्रान खान विश्वास व्यक्त केला.

इम्रान सरकारने तीन वर्षे पूर्ण केली

गेल्या महिन्यात इम्रान खान यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली. इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी इस्लामाबादमधील जिन्ना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांच्या पक्षाच्या कामगिरीचा आढावा अहवाल सादर केला. इम्रान खान म्हणाले, 'गेली तीन वर्षे खूप कठीण होती. जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती.

Imran Khan
पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये घेणार तालिबान्यांची मदत

विरोधक पाकिस्तानी पंतप्रधानांवर हल्ला करत आहेत

'आम्ही सत्ता हाती घेतली तेव्हा देशाचा परकीय चलन साठा 16.4 अब्ज अमेरिकन डॉलर होता आणि आज तो 27 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. तीन वर्षांपूर्वी आमचे कर संकलन 3,800 अब्ज रुपये होते आणि आता ते 4,700 अब्ज रुपयांवर पोहचले आहे'. अस यावेळी इम्रान खान म्हणाले. तथापि, इम्रानच्या दाव्यांच्या उलट, पाकिस्तानमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यामुळेच विरोधक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी रविवारी सांगितले की, "आम्ही हजारो लोकांसह इस्लामाबादला जाऊ आणि महागाई आणि हे बनावट आणि भ्रष्ट सरकार राजकीयदृष्ट्या उलथवून टाकू."

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com