पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खान दोषी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

चलनवाढीबद्दल पाकिस्तानमधील ४९ टक्के जनता पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी धरते.जिओ न्यूज या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. इप्सॉय या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सर्वेक्षणाचा हवाला त्यांनी दिला आहे.

इस्लामाबाद :  चलनवाढीबद्दल पाकिस्तानमधील ४९ टक्के जनता पंतप्रधान इम्रान खान यांना दोषी धरते.जिओ न्यूज या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. इप्सॉय या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सर्वेक्षणाचा हवाला त्यांनी दिला आहे. त्यानुसार महागाईचा फटका तब्बल ९७ टक्के जनतेला बसला. ८८ टक्के जनता महागाईमुळे चिंताक्रांत झाली आहे.

इम्रानचा दावा फोल
सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून इम्रान तसेच त्यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाने आधीच्या सरकारला दोष देण्याचा पवित्रा घेतला आहे, मात्र या सर्वेक्षणात केवळ १५ टक्के जनतेने याविषयी सहमती दर्शविली.
 

 

संबंधित बातम्या