Pakistan Political Crisis: कंगाल पाकिस्तान पेटले, इम्रान खान यांच्या अटकेनंतर परिस्थिती चिघळली!

Protest in Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील परिस्थिती चिघळली आहे.
Imran Khan
Imran Khan Dainik Gomantak

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील परिस्थिती चिघळली आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) चे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी समर्थकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले, त्यानंतर पीटीआय समर्थक ठिकठिकाणी गोंधळ, तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत.

तर दुसरीकडे, इस्लामाबाद उच्च न्यायालयानेही (High Court) इम्रान यांच्या अटकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून अटक करण्यात आली. त्यांना रेंजर्सच्या मदतीने एनएबी म्हणजेच नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने ताब्यात घेतले.

Imran Khan
Pakistan: पाकिस्तानचे 'स्वित्झर्लंड' तालिबान्यांच्या ताब्यात, आता येथे उभारणार दहशतवादी कॅम्प; दशकभर...

दरम्यान, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी खान यांच्या अटकेवर नाराजी व्यक्त करत आयजींना 15 मिनिटांत उत्तर देण्यास सांगितले.

आयजी इस्लामाबाद (Islamabad) यांनी एका निवेदनात सांगितले की, पीटीआयचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की, इस्लामाबादमधील परिस्थिती सामान्य आहे, शहरात कलम 144 लागू आहे, उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

Imran Khan
Pakistan: पैगंबरांशी केली इम्रान खान यांची तुलना; ईशनिंदेच्या आरोपाखाली जमावाकडून एकाची हत्या

हिंसाचाराच्या भीतीने इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे

इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात हिंसाचार सुरु झाला आहे. इम्रान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड, जाळपोळ सुरु केली.

हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले. इस्लामाबादशिवाय पाकिस्तानच्या अनेक भागात निदर्शने सुरु झाली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com