वाढत्या बलात्कार आणि बाल शोषण घटनांनी पाकिस्तान सरकार धास्तावले

लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी पंजाब राज्यात आणीबाणी लागु
Pakistan News
Pakistan News Dainik Gomantak

पाकिस्तानमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. यामूळे कार्यक्षम मनुष्यबळ व्यर्थ जात असल्याची स्थिती आहे. असे असले तरी सध्या बलात्कार आणि बाल शोषण घटनांचा वाढत असलेला आकडा पाकिस्तानसाठी आता डोके दुखी ठरत आहे. अशा घटना प्रामुख्याने पाकिस्तानातील पंजाब प्रांतात वेगाने वाढत असल्याची बाब समोर आली आहे. (pakistan punjab declare emergency for stop rape cases )

वाढत असलेल्या बलात्कार आणि बाल शोषणाच्या घटनांमूळे जणू पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पूर आला आहे, असे म्हटले जात आहे. पाकिस्तान सरकारने महिला आणि मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणे थांबवण्यासाठी पंजाब राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. याबाबत बोलताना पंजाबचे गृहमंत्र्यांनी यांनी सांगितले की, प्रशासनाला "बलात्काराच्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी आणीबाणी जाहीर करणे" भाग पडले. आणि ही समाज आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी गंभीर समस्या बनली आहे.

Pakistan News
नवाझ शरीफ यांची तुरुंगात होणार रवानगी, PAK च्या कायदामंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानच्या एका वर्तमान पत्राने याबाबत असे म्हटले आहे की, 'पंजाबमध्ये दररोज बलात्काराची चार ते पाच प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत आहे. यावर कायदा मंत्री मलिक मुहम्मद अहमद खान म्हणाले की, सर्व प्रकरणांचा आढावा कॅबिनेट समिती बलात्कार आणि कायदा व सुव्यवस्था या विषयावर बैठक घेईल आणि अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागरी संस्था, महिला अधिकार संघटना, शिक्षक आणि वकील यांचाही सल्ला घेतला जाईल.

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2021 मध्ये ही पाकिस्तान पहिल्या तीन मध्ये

ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2021 च्या रँकिंगनुसार, पाकिस्तान 156 देशांपैकी 153 क्रमांकावर आहे, इराक, येमेन आणि अफगाणिस्तानच्या अगदी वर आहे. इंटरनॅशनल फोरम फॉर राइट्स अँड सिक्युरिटी (IFFRAS) मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये गेल्या चार वर्षांत १४,४५६ महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद झाली आहे, तर पंजाबमध्ये या संदर्भात सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com