कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचा संबंध आणखी एका भारतीय कैद्याशी जोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

भारताचे माजी नौदल अधिकारी आणि सध्या पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचा संबंध आणखी एका भारतीय कैद्याशी जोडण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.

नवी दिल्ली : भारताचे माजी नौदल अधिकारी आणि सध्या पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्या खटल्याचा संबंध आणखी एका भारतीय कैद्याशी जोडण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, भारतीय नागरिक मोहम्मद इस्माईलच्या सुटकेसाठी लढा देणाऱ्या वकीलावर पाकिस्तानच्या बाजूने काम करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

 

कन्सुलर प्रॅक्टिसमध्ये वकिल शाहनवाज नून यांना भारतीय कैदी, मोहम्मद इस्माईल यांची सुटका आणि परत पाठविण्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नेमले होते. मोहम्मद इस्माईल यांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे पण तरीही ते पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. परंतु, इस्माईल संदर्भातील खटल्याच्या कार्यवाही दरम्यान, पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरल यांनी कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित प्रकरण उचलले, परंतु दोन्ही प्रकरणे कोणत्याही प्रकारे जोडलेली नाहीत असे श्रीवास्तव म्हणाले. वकिल शाहनवाज नून यांनी पाकिस्तानच्या दबावामुळे भारतीय कैदी मोहम्मद इस्माईल आणि कुलभूषण जाधव यांची प्रकरणे अंतर्गतरित्या जोडली गेल्याचे कोर्टात सांगितले.

 

कुलभूषण जाधव प्रकरणाबाबतच्या बिनधास्त आणि बिनशर्त कौन्सिलर अॅक्सेस देण्याच्या भारताच्या मुख्य मागण्यांवर प्रतिसाद देण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव ते म्हणाले, "इस्लामाबादमधील आमच्या अधिकाऱ्यांनी वकिल शाहनवाज नून यांना पत्र लिहून सांगितले की कुलभूषण जाधव यांचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार आपल्याकडे नाही आणि भारतीय प्रभारी अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर व्हावे असे आपण कोणत्याही आधारे सांगू शकत नाही."

 

अधिक वाचा :

एच-१बी व्हिसा देण्याची मर्यादा अमेरिकेकडून रद्द ; ‘ग्रीन कार्ड’साठी प्रतीक्षा करणाऱ्या अमेरिकेतील लाखो भारतीयांना होणार फायदा

 

 

संबंधित बातम्या