पाकिस्तान हिंसाचार: 800 हुन अधिक शीख भाविक अखेर पंजा साहिबला पोहचले

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 एप्रिल 2021

बैसाखीनिमित्त पाकिस्तानातील गुरु ननकाना यात्रेसाठी गेलेले ८०० हुन अधिक भारतीय नागरिक गुरु डेरा साहिब  याठिकाणी अडकून पडले होते.  त्यानंतर या भाविकांनी भारतीय परदेश मंत्रालयाकडे मदतीसाठी आवाहन केले होते.

बैसाखीनिमित्त पाकिस्तानातील गुरु ननकाना यात्रेसाठी गेलेले 800 हुन अधिक भारतीय नागरिक गुरु डेरा साहिब  याठिकाणी अडकून पडले होते.  त्यानंतर या भाविकांनी भारतीय परदेश मंत्रालयाकडे मदतीसाठी आवाहन केले होते. या नंतर अखेर या सर्व भाविकांना बुधवारी पंजा साहिब गुरुद्वारामध्ये पोहचविण्यात आले आहे. त्याचबरोबर  भारत आपल्या शीख भाविकांच्या रक्षणासाठी पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याची माहितीही भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. (Pakistan Violence: More than 800 Sikh devotees finally reach Panja Sahib) 

पाकिस्तानात अडकले भारतीय नागरिक; सुटकेसाठी भारतीय उच्चायुक्तालयाकडे संपर्क 

पाकिस्तानातील लाहौरमध्ये बैसाखीनिमित्त  गुरु ननकाना यात्रेसाठी भारतातील शीख भाविकांची एक तुकडी सोमवारी वाघा सीमेमार्गे लाहौरला पोहोचली. हे शीख भक्त पजा साहिब येथे होणाऱ्या बैसाखी महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र पाकिस्तानात उसळलेल्या हिंसाचारामुळे हे शीख यात्रेकरू निश्चित ठिकाणी पोहचू शकले नाहीत. त्यानंतर काल त्यांना लाहौरहुन 25 बसेसच्या माध्यमातून हसन अब्देल येथील गुरुद्वारा पंजा साहिबमध्ये पोहचविण्यात आले. या बसेसची सुरक्षा पाकिस्तान पंजाब पोलिस आणि पाकिस्तानी रेंजर्सकडे होती. 

भारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता? अमेरिकी गुप्तचर खत्याचा दावा  

दरम्यान, पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उफाळला आहे. तेहरीक-ए-लाबिक पाकिस्तानचे समर्थक फ्रान्सच्या राजदूताला देशातून हाकलून लावण्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने करत  आहेत.  या हिंसाचारामुळे पाकिस्तानात गेलेले भारतीय शीख नागरिक गुरु डेरा साहिब  याठिकाणी  अडकून  पडले होते. त्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भाविकांची तुकडी 14 तास प्रवास करून पंजाब साहिब याठिकाणी पोहचली. खरतरं, लाहोरहून  पंजा साहिबला जाणयासाठी बसमधून फक्त 3 तास लागतात. 

दुसरीकडे, दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी बुधवारी केलेल्या ट्विटमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना टॅग करत पाकिस्तानमध्ये अडकलेल्या या भाविकांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.  याला उत्तर देताना जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. “शीख भाविकांच्या संपूर्ण दौऱ्यावर आमची बारीक नजर आहे. आम्ही पाकिस्तानी अधिकारी आणि शीख गटांशी  सतत संपर्क साधत आहोत. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि ते सुरक्षित मार्गाने पुन्हा भारतात पोहचण्यासाठी प्रत्येक पाऊल उचलले जाईल, अशी ग्वाही एस. जयशंकर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या