Al-Zawahiri Killed: अल-जवाहिरीच्या मृत्यूमागे पाकिस्तानचा हात?

पाकिस्तानने पैसे घेऊन अल-जवाहिरीला मारले आहे. अल जवाहिरी महिनाभरापूर्वी पाकिस्तानातून अफगाणिस्तानला गेला होता.
Ayman Al Zawahiri
Ayman Al ZawahiriDainik Gomantak

Pakistan Role in Al Zawahiri Killing: अल कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरीचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ठार मारले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अल-जवाहिरीला मारण्यात पाकिस्तानचा हात असल्याची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पैसे घेऊन अल-जवाहिरीला मारले आहे. अल जवाहिरी महिनाभरापूर्वी पाकिस्तानातून अफगाणिस्तानला गेला होता.

Ayman Al Zawahiri
Ayman Al Zawahiri: अमेरिकेन ड्रोन हल्ल्यात अल-कायदा चीफ अल-जवाहिरी ठार

पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान अल-जवाहिरीच्या प्रत्येक हालचालीची माहिती पाकिस्तानी लष्कराला देण्यात आली होती. तालिबानच्या संपर्कात असल्यामुळे अल-जवाहिरी कुठे राहतो, याची माहिती होती.

अल-जवाहिरीच्या मृत्यूमागे पाकचा हात?

जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने पैसे घेऊन अल-जवाहिरीला मारले आहे. त्याला अमेरिकेतून निधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा अमेरिकेतील अनेक लोकांच्या संपर्कात होते. पाकिस्तानने तीन दिवसांपूर्वीच निधीची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Ayman Al Zawahiri
कोण होता Ayman Al Zawahiri? सर्जन ते मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, वाचा सविस्तर

अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला

अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीला मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानी तळाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, कारवाईत पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यात आल्याचा पाकिस्तानी लष्कराने इन्कार केला आहे. 31 जुलै रोजी सकाळी 6.18 वाजता अल-जवाहिरी मारला गेला. काबूलच्या शेरपूर भागात दहशतवादाचा हा सरदार लपला होता आणि बाल्कनीतून बाहेर येताच अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला. अल-जवाहिरीशिवाय कुटुंबातील इतर सदस्यांना इजा झाली नसल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com