पाकिस्तानचे ऊर्जा संकट संपणार? सिंध प्रांतात सापडले गॅसचे साठे

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी गुरुवारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचे ऊर्जा संकट संपणार? सिंध प्रांतात सापडले गॅसचे साठे
Province of SindhDainik Gomantak

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी गुरुवारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. स्थानिक मीडियानुसार, पाकिस्तानच्या सरकारी मालकीच्या कंपनीला सिंध प्रांतात गॅसचा मोठा साठा सापडला आहे. Aari न्यूजनुसार, सरकारी मालकीच्या तेल आणि वायू कंपनीला हा वायूचा साठा सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात सापडला आहे.

अहवालानुसार, पाकिस्तानच्या सरकारी ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (OGDCL) ने दावा केला आहे की, या शोधामुळे पाकिस्तानला ऊर्जा संकटावर मात करण्यास मदत होईल. OGDCL ने पाकिस्तानच्या (Pakistan) ऊर्जेची मागणी कमी करण्यासाठी हा एक मौल्यवान स्त्रोत असल्याचे म्हटले आहे.

Province of Sindh
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

कंपनीने असेही म्हटले आहे की, या साठ्यांचा शोध गुड्डू जॉइंट व्हेंचर पार्टनर्सच्या माध्यमातून लागला आहे. ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडची (70%) ऑपरेटर म्हणून संयुक्त भागीदारी आहे. याशिवाय, SPUD Energy Pty Ltd (13.5%), IPR Transoil Corporation (11.5%) आणि Government Holdings Pvt Ltd (5%) यांचाही सहभाग आहे.

"या शोधामुळे एक नवीन मार्ग खुला झाला असून स्वदेशी संसाधनांमधून ऊर्जेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरुन काढण्यासाठी मदत होईल.''

Province of Sindh
कर्जमाफीसाठी पाकिस्तान विकतोय शेळ्या, वाचा संपूर्ण प्रकरण

IMF कडून निधी मिळवण्यासाठी पाकिस्तानने इंधनाच्या दरात मोठी वाढ केली

पाकिस्तानसाठी ही दिलासादायक बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा तिथे तेलासह ऊर्जेच्या किंमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून निधी मिळविण्यासाठी, पाकिस्तान सरकारने सबसिडी काढून टाकून इंधनाच्या किमतीत 29 टक्क्यांपर्यंत प्रचंड वाढ केली आहे.

दुसरीकडे, वित्तीय तूट कमी करण्यासाठी आणि त्रस्त अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे 20 दिवसांत इंधन अनुदानात केलेली ही तिसरी कपात आहे.

Province of Sindh
युक्रेन मुद्यावर UN मध्ये भारत पाकिस्तान साथ-साथ

शिवाय, अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी सांगितले की, नवीन किमती बुधवार, 15 जूनच्या मध्यरात्रीपासून लागू झाल्या आहेत. पेट्रोलच्या (Petrol) दरात प्रतिलिटर 24 रुपये आणि डिझेलच्या (Diesel) (एचएसडी) दरात 59.16 रुपयांनी मोठी वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com