मॉडेलिंग करत होती म्हणून पाकिस्तानी व्यक्तीने केली 21 वर्षीय बहिणीची हत्या

ही महिला पंजाब प्रांतात नृत्य आणि मॉडेलिंग करत होती
मॉडेलिंग करत होती म्हणून पाकिस्तानी व्यक्तीने केली 21 वर्षीय बहिणीची हत्या
Crime NewsDainik Gomantak

ऑनर किलिंगच्या आणखी एका संशयित प्रकरणात एका 21 वर्षीय पाकिस्तानी महिलेची तिच्या भावाने गोळ्या झाडून हत्या केली. ही महिला पंजाब प्रांतात नृत्य आणि मॉडेलिंग करत होती, त्यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे. प्रांतीय राजधानी लाहोरपासून 130 किमी अंतरावर असलेल्या रेनाला खुर्द ओकारा येथे सिद्रा स्थानिक कपड्यांच्या ब्रँडसाठी ती मॉडेलिंग करत होती आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध जाऊन फैसलाबाद थिएटरमध्ये नृत्य करत असे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार तिला हे सगळ करायाला आवडत होतं मात्र तिच्या घरच्यांचा विरोध होता. (Pakistan Crime)

Crime News
मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याप्रकरणी हिंदू तरुणाची भर रस्त्यात हत्या

सिद्राच्या पालकांनी तिला "कौटुंबिक परंपरेच्या विरुद्ध" असल्याचे सांगून तिलाम्हणून हा व्यवसाय सोडण्यास भाग पाडले, परंतु सिद्राने न एकता आपल काम पुढे चालू ठेवण्याचा आग्रह धरला. आणि तोज तिच्या जिवावर बेतला. पोलिसांनी सांगितले की, सिद्रा गेल्या आठवड्यात फैसलाबादहून आपल्या कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी घरी आली होती.

मॉडेलिंग आणि नृत्याचा राग करायचे घरचे

तिचे आई-वडील आणि भाऊ हमजा यांनी व्यवसायातील प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून तिच्याशी वाद घातला आणि तिने तो व्यवसाय न सोडल्याने तिला मारहाण केली. नंतर दिवसा, हमजाने सिद्रावर गोळीबार केला, त्यात ती जागीच ठार झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची कबुली देणाऱ्या हमजाला अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Crime News
कारवारमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त

पाकिस्तानमधील आदिवासी भागात सुरू असलेल्या ऑनर किलिंगची प्रकरणे सामान्य बाब झाली आहे.पाकिस्तानचे पोलीस अधिकारी फराज हमीद यांनी सांगितले की, सिद्राला तिच्या एका नातेवाईकाने सिद्राचा नाच करतानाचा व्हिडिओ पाठवला तेव्हा घरचे संतापले. तेव्हा भाऊ हमजाने पोलिसांना कबूली दिली की, त्याने आपल्याच बहिणीवर रागाच्या भरात गोळ्या झाडल्या आणि त्याच्या बहिणीचा खून केला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये 19 वर्षीय डान्स आर्टिस्ट आयेशाची तिच्या माजी पतीने फैसलाबादमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. पाकिस्तानमध्ये, विशेषतः उत्तर आणि पश्चिमेकडील आदिवासी भागांच्या जवळ असलेल्या भागात ऑनर किलिंगच्या घटना वारंवार घडत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.