'पाकिस्तानमधील खासदाराने हिंदू समाजाची मागितली माफी'

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

विरोधी पक्षनेत्या नवाज मरियन यांच्य़ावर टोमणा मारण्यासाठी खासदार हुसैन यांनी हिंदू देवतांचा फोटो शेअर केला होता.

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारमध्ये असणाऱ्य़ा खासदाराला पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजाची माफी मागावी लागली आहे. इम्रान खान यांचा तेहरिक- ए- इन्साफ पक्ष पाकिस्तानात सत्तेवर आहे. आमिर लियाकत हुसैन असे या खासदाराचे नाव आहे. या खासदाराने हिंदू समाजाचा अनादर केलेले ट्विट सोशल मिडियावरुन केले होते. त्यानंतर त्यांना आपले ट्विट काढून टाकत माफी मागावी लागली.

पाकिस्तानमधील अल्पसंख्य़ाक असणाऱ्या हिंदू समाजाने या खासदाराच्या ट्विटचा जोरदार निषेध केला होता. तसेच त्यांनी त्वरीत माफी मागावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. आमिर लियाकत हुसैन हे तेहरिक- ए- इन्साफ पक्षाकडून पाकिस्तानमधील राष्ट्रीय सभागृहाचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेत्या नवाज मरियन यांच्य़ावर टोमणा मारण्यासाठी खासदार हुसैन यांनी हिंदू देवतांचा फोटो शेअर केला होता.

चीनचा अजब दावा; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले...

हुसैन पाकिस्तानातील टिव्हीवर भलतेच प्रसिध्द आहेत. धार्मिक अभ्यासक अशी त्यांची पाकिस्तानात ख्याती आहे. त्य़ांनी हिंदू समाजाचा अपमान करणारे ट्विट केल्य़ानंतर हिंदू समाजाबरोबर तेथील राजकारणी मंडळीनीही त्यांच्यावर टिकेची झोड उटवली. त्यांनतर खासदार हुसैन यांनी हिंदू समाजाची माफी मागितली. ते म्हणाले, ''हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याची मला कल्पना आहे. माझा सर्व धर्मांवर विश्वास आहे. हेच माझ्या धर्माने शिकवले आहे,'' असे हुसैन यांनी म्हटले. 

संबंधित बातम्या