Pakistani पत्रकाराने महिला फुटबॉलपटूंच्या शॉर्ट्स परिधान करण्यावर उपस्थित केला प्रश्न

लोकांनी पत्रकारावर केली जोरदार टिका
Pakistani पत्रकाराने महिला फुटबॉलपटूंच्या शॉर्ट्स परिधान करण्यावर उपस्थित केला प्रश्न

एका पाकिस्तानी पत्रकाराने (Pakistani Reporter) महिलांच्या एका स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय महिला फुटबॉल संघाच्या खेळाडूंनी शॉर्ट्स परिधान केल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यानंतर त्या पत्रकाराला टीकेला सामोरे जावे लागले. काठमांडू येथे सुरू असलेल्या सैफ चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानने मालदीवचा सात गोलने पराभव केला. या स्पर्धेनंतर पत्रकाराने महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेप घेतला.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, पत्रकाराने महिला संघाचे व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला. "तुम्हाला माहिती आहे की आम्ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे आहोत जो इस्लामिक देश आहे, मला विचारायचे आहे की या मुली शॉर्ट्स का घालतात. लेगिज का नाही?

खेळाडूंच्या कपड्यांवर आणि त्यांच्या कर्तृत्वावर लक्ष केंद्रित न केल्याबद्दल अनेकांनी पत्रकाराची टिका केली.

Pakistani पत्रकाराने महिला फुटबॉलपटूंच्या शॉर्ट्स परिधान करण्यावर उपस्थित केला प्रश्न
Sonali Phogat Death: सीबीआय अन् फॉरेन्सिक अधिकारी पुन्हा लिओन रिसॉर्टमध्ये दाखल

संघाचे प्रशिक्षक आदिल रिझकी पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाने पूर्णपणे गोंधळून गेले. रिझकी म्हणाले, 'प्रत्येकाने खेळात प्रगती केली पाहिजे. पोशाखा बाबत बोलायचे झाल्यास, आम्ही कधीही कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नाही, ही अशी गोष्ट आहे ज्यावर आमचे नियंत्रण नाही.'

पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नामुळे सोशल मीडियावर चर्चेला पेव फुटले आहे. अनेकांनी पत्रकाराच्या संकुचित मानसिकतेबद्दल त्याला फटकारले. शॉर्ट्समध्ये खेळाडू पाहण्यात समस्या येत असेल तर त्याने कार्यक्रम कव्हर करू नये. असा सल्लाही नेटकऱ्यांनी त्याला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com