Pakistan: मदरशाचा शिक्षक बनला हैवान, 10 मुलांवर केला 2 महिने अत्याचार

आरोपी मुलांना जबरदस्तीने मदरशातील खोलीत न्यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा
Pakistan Abuse Case
Pakistan Abuse Case

लाहोर: अलिकडे बाल लैंगिक गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुलींवरच नाही तर मुलांबरोबरही काही नराधम दुष्कृत्य करत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका मदरशाच्या शिक्षकाला बुधवारी 10 अल्पवयीन विद्यार्थ्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पोलिस अधिकारी अख्तर फारूक यांनी बुधवारी सांगितले की, लाहोरपासून सुमारे 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या सादिकाबाद रहीम यार खानमधील 'भुट्टा वहान' भागात आरोपी कारी बशीरने गेल्या दोन महिन्यापासून मुलांचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. आता त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Pakistan Abuse Case
Al-Zawahiri Killed: अल-जवाहिरीच्या मृत्यूमागे पाकिस्तानचा हात?

मदरशातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली. एफआयआरमध्ये आरोप आहे की बशीरने त्याच्या मुलांना जबरदस्तीने मदरशातील त्याच्या खोलीत नेले आणि त्यांचा विनयभंग केला. पोलिसांनी चारही पीडितांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे.

“आम्ही इतर विद्यार्थ्यांना विनंती केली आहे की त्यांचेही लैंगिक शोषण झाले असल्यास पोलिसांना कळवावे, असे फारुख म्हणाले. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे की, याबाबात कोणाला काही सांगितले तर तो त्यांना ठार मारून टाकेल असे पिडितांनी आपल्या जबानीत म्हटले आहे.

Pakistan Abuse Case
Ayman Al Zawahiri: 'हल्ला होऊ शकतो...', जवाहिरीच्या मृत्यूनंतर America ने दिला इशारा

आरोपींची चौकशी सुरू असून पीडितांची संख्या 10 पेक्षा जास्त असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी बशीरला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com