पाकिस्तानच्या एधी संस्थेनं भारताला दिला मदतीचा हात

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात 24 तासात 3 लाख 32  हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. हा एका दिवसातील एवढा मोठा उच्चांक असून भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1  कोटी 62 लाख 63 हजारांवर पोहचली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. ऑक्सिजन (Oxygen) बेड्स, औषधे आणि रुग्णांवाहिकांची कमतरता जाणवू लागली आहे. असं असतानाच भारतातील (India) गंभीर परिस्थीती पाहून पाकिस्तानने भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानमधील(Pakistan) सेवाभावी संस्था असणाऱ्या एधी फाऊंडेशनने (Edhi Foundation) भारताला 50 रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रही लिहलं आहे. सध्या एधीने घेतलेल्या या पुढाकारासाठी पाकिस्तानमध्ये कौतुक केलं जात आहे. (Pakistans Adhi organization extended a helping hand to India)

एधी फाऊंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक आणि ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी (Faisal Edhi) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून पत्र लिहलं आहे. ‘’आम्ही भारतामधील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. कोरोना आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम याच्यावर आमचं सातत्याने लक्ष आहे. या कोरोना महामारीचा तुमच्या देशावर झालेल्या गंभीर परिणामासंदर्भात आम्हाला चिंता आहे. भारतीय जनतेला कोरोनासंदर्भातील महामारी तोंड द्याव लागत आहे. सध्य़ाच्या या संकटाच्या कठीण काळामध्ये शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून 50 रुग्णवाहिका पाठवू इच्छितो. रुग्णवाहिकांसोबतच आम्ही त्यासोबत सेवा तुम्हाला देऊ इच्छितो,’’ असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.

Oxgen Shortage: चीनने पुढे केला मदतीचा हात; भारताने मात्र...

‘’मी फैजल एधी, एधी फाऊंडेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्य़ा संस्थेमधील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. सध्याची कोरोना परिस्थिती गंभीर आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. यामध्ये तुमच्या कोणत्याही नियोजनामध्ये आमची कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. त्यामुळेच आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णवाहीकांसोबत आम्ही एक स्वंय़सेवकाची टीम पाठवू,’’ असंही या पत्रामध्ये म्हटलं आहे.

‘’विशेष म्हणजे पाकिस्तानमधून पाठवण्यात येणारी ही टीम स्वत: सोबत सर्व सामान घेऊन येणार आहे. भारताकडून आम्हाला केवळ परवानगी देण्यात यावी असंही म्हटलं आहे. आम्हाला भारतामध्ये ही योजना राबवण्यासाठी भारताकडून कोणत्याही प्रकारची मदत नकोय. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू’’

पाकिस्तानमध्ये जवळपास एक दशकाहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर 2015 साली भारतात परतलेली मूकी आणि बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमधील एधी फाऊंडेशनचे केली होती. भारतामध्ये गीता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा संभाळ करणाऱ्या एधी फाऊंडेशनला एक कोटी रुपांयाची मदत जाहीर केली होती.
 

संबंधित बातम्या