पाकिस्तानी अधिकाऱ्याची नेपाळ लष्करप्रमुखांशी भेट, भारताला सूचक इशारा
Nepal Ambassador Dainik Gomantak

पाकिस्तानी अधिकाऱ्याची नेपाळ लष्करप्रमुखांशी भेट, भारताला सूचक इशारा

काठमांडूमध्ये (Kathmandu) पाकिस्तानचे उप राजदूत अदनान जावेद खान (Adnan Javed Khan) यांनी शर्मा यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली.

मागील काही महिन्यांपासून नेपाळची (Nepal) चीनशी (China) वाढत असलेली जवळीकता भारताची चिंता वाढवत आहे. यातच आता चीनचा नव्याने मित्र बनलेला आणि भारताचा कट्टर शत्रू पाकिस्तानही (Pakistan) नेपाळशी राजनयिक संबंधाबरोबर कूटनितीक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. याच पाश्वभूमीवर नेपाळमधील पाकिस्तानी दूतावासातील एका वरिष्ठ राजनयिक अधिकाऱ्याने बुधवारी नेपाळचे लष्करप्रमुख प्रभुराम शर्मा (Prabhuram Sharma) यांची भेट घेतली असून द्विपक्षीय संंबंध आणि परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली. काठमांडूमध्ये (Kathmandu) पाकिस्तानचे उप राजदूत अदनान जावेद खान (Adnan Javed Khan) यांनी शर्मा यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली.

Nepal Ambassador
चीन, रशिया आणि पाकिस्तान तालिबानसोबतच, तिन्ही देशांचे दूत चर्चेसाठी काबूलमध्ये

नेपाळच्या लष्करी मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पाकिस्तानी मुत्सद्दी आणि लष्करप्रमुख यांच्यात झालेल्या भेटीत द्विपक्षीय हितसंबंध आणि परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या बैठकीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा नेपाळचे नवे परराष्ट्र मंत्री नारायण खडका (Foreign Minister Narayan Khadka) यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जगाला संदेश देणारे विधान केले होते.

नेपाळचे लष्करप्रमुख जेव्हा पाकिस्तानला गेले

नेपाळमध्येही घडत असलेल्या राजकिय घडामोडी भारत (India) नजर ठेवून आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, दुसऱ्या देशाच्या लष्करप्रमुखांशी राजनयिक अधिकाऱ्यांची बैठक ही एक असाधारण घटना असून ती गांभीर्याने घेतली पाहिजे. नेपाळी लष्करांच्या मते, अशा बैठका दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, वर्ष 2018 मध्ये नेपाळचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल राजेंद्र छेत्री (Army Chief General Rajendra Chhetri) यांनीही पाकिस्तानला भेट दिली होती.

त्याच वर्षी नेपाळ लष्कराचे नूतन प्रमुख जनरल (निवृत्त) पूर्णचंद्र थापा (Purnachandra Thapa) म्हटले होते की, पाकिस्तान लष्कराशी संबंध एका नव्या टप्प्यात आहेत. 2018 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी देखील नेपाळला भेट दिली होती.

Nepal Ambassador
IPL 2021: 'मैं पाकिस्तान जा रहा हूं' म्हणत गेलने क्रिकेटप्रेमींना केले आश्चर्यचकित

नेपाळच्या राजदूताने इम्रान खान यांची घेतली भेट

नेपाळमधील पाकिस्तानी राजनयिकांच्या बैठकीच्या सुमारे एक आठवडा आधी पाकिस्तानमधील नेपाळचे राजदूत यांनी इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी नेपाळी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी असेही म्हटले गेले की, नेपाळने नेहमीच पाकिस्तानी लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबदल्यात इम्रान खान यांनी नेपाळच्या पंतप्रधानांनाही शुभेच्छा संदेश पाठवले होते.

नेपाळी राजदूतांनी पंतप्रधान इम्रान खान यांना सांगितले होते की, नेपाळ आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंध नेहमीच खास राहिले आहेत. हे संबंध परस्पर विश्वास आणि सहकार्यावर आधारित आहेत. नेपाळ आणि पाकिस्तान दोन्ही दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेचे (SAARC) सदस्य आहेत. नेपाळच्या राजदूताने अशी आशा व्यक्त केली होती की, येत्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ होतील.

Related Stories

No stories found.