पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी दिला 17 पत्रकारांना घरचा आहेर

पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे भाषण कव्हर न केल्याबद्दल पाकिस्तानच्या सरकारी PTV ने 17 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी दिला 17 पत्रकारांना घरचा आहेर
Shehbaz SharifDainik Gomantak

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे भाषण कव्हर न केल्याबद्दल पाकिस्तानच्या सरकारी PTV ने 17 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ नुकतेच लाहोर (Lahore) दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पंतप्रधानांचे भाषण कव्हर न करण्यामागे अत्याधुनिक लॅपटॉप नसल्याचे कारण देण्यात आले. (Pakistan's government PTV has fired 17 employees for not covering Prime Minister Shehbaz Sharif's speech)

Shehbaz Sharif
''पाकिस्तान कर्जात बुडाला'': पंतप्रधान शाहबाज शरीफ

खरं तर, पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये असताना ही घटना घडली. यादरम्यान त्यांनी कोट लखपत कारागृह आणि रमजान बाजाराला भेट दिली होती. दुसरीकडे, असे सांगण्यात येत आहे की, सामान्यतः पत्रकार आणि संपादकांची व्हीव्हीआयपी टीम पंतप्रधानांच्या कार्यक्रमांच्या कव्हरेजसाठी जबाबदार असते.

Shehbaz Sharif
कोण होत्या 'मदर ऑफ पाकिस्तान' त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक?

द डॉनने एका वृत्तात म्हटले आहे की, ''ही व्हीव्हीआयपी टीम असल्याने ती अत्याधुनिक गॅजेट्सने सुसज्ज असते. लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी लॅपटॉप आणि कोणत्याही घटनेचे फुटेज वेळेवर अपलोड करणे ही त्यांची जबाबदारी असते. ही कोअर टीम इस्लामाबादमध्ये (Islamabad) तैनात आहे, आणि विशेष म्हणजे देश-विदेशात पंतप्रधानांसोबत असते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लाहोर भेटीपूर्वी पीटीव्हीला या भेटीची माहिती देण्यात आली होती.''

दरम्यान, व्हीव्हीआयपी टीम अत्याधुनिक गॅजेट्सने सुसज्ज असतानाही हे घडले. सध्या या घटनेनंतर कारवाई करत PTV प्रशासनाने VVIP कव्हरेज उपनियंत्रक इम्रान बशीर खान यांच्यासह एकूण 17 अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. याशिवाय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विविध अभियंते आणि कॅमेरामन यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.