पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची जीभ घसरली

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पाकिस्तानमध्ये इम्रान सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचे  वेतनवाढीसाठी  आंदोलन सुरु असताना पाकिस्तानच्य़ा गृहमंत्र्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत.

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये इम्रान सरकारच्या विरोधात सराकरी कर्मचाऱ्यांचे  वेतनवाढीसाठी  आंदोलन सुरु असताना पाकिस्तानच्य़ा गृहमंत्र्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. विरोध करणाऱ्यांवर पाकिस्तान पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला होता. या संदर्भात पाकिस्तानचे गृहमंत्री रशीद अहमद म्हणाले, ‘’अश्रुधुराचे गोळे गेले अनेक दिवस पडून होते, त्य़ामुळे चाचणी करण्यासाठी त्यांचा वापर करणे गरजेचे होते.’’

पाकिस्तानमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी आंदोलन सुरु असताना पाकिस्तान पोलिसांनी 10 फेब्रुवारी रोजी या कर्मचाऱ्यांवर अश्रुधुरांचा वापर केला होता. पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये भरलेल्या एका सभेत त्यांनी आपले मत मांडले होते. मात्र सोशल मिडीयावर गृहमंत्री रशीद अहमद यांचा निषेध केला जात आहे. आणि त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानच्या नागरिकांची माफी मागावी अशीही मागणी केली जात आहे. पाकिस्तानमधील समा टिव्हीने हे वृत्त दिले होते.

''या'' देशात आली इबोलाची महामारी

वेतनवाढीच्या संदर्भात दोन हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून पाकिस्तानच्या संसद भवानावर मोर्चा घेवून जाण्य़ाची योजना आखली होती. दरम्यान या मोर्चावर पोलिसांनी अश्रुधुरांचा वापर केला होता. इम्रान सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अमानुष पध्दतीने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या वागणूकीविरोधात विरोधी पक्षांनी जाब विचारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान अधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन होत आहे.   

संबंधित बातम्या