पाकिस्तान पुन्हा उतरला तालिबान्यांच्या समर्थनार्थ, जगाला दिला हा संदेश
Shah Mahmood QureshiDainik Gomantak

पाकिस्तान पुन्हा उतरला तालिबान्यांच्या समर्थनार्थ, जगाला दिला हा संदेश

कुरेशी यांनी स्पॅनिश परराष्ट्र मंत्री जोसे मॅन्युएल अल्बेरेस (José Manuel Albares) यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) अखेर अंतरिम सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार पाकिस्तानची कठपुतळी असल्याचे म्हटले जात आहे. यातच आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले, अफगाणिस्तानबाबत नव्याने सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची गरज आहे. त्यांनी यावेळी इशाराही दिला की, अफगाणिस्तानला वेगळे केल्याने अफगाण लोक, प्रदेश आणि जगावर याचे गंभीर परिणाम होतील. कुरेशी यांनी स्पॅनिश परराष्ट्र मंत्री जोसे मॅन्युएल अल्बेरेस (José Manel Albares) यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अल्बायर्स इस्लामाबादला पोहोचले आहेत.

Shah Mahmood Qureshi
अफगाणिस्तान सरकारच्या माध्यम प्रमुखांची तालिबानकडून हत्या

माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी परराष्ट्र मंत्रालयात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी कुरेशी म्हणाले, "अफगाणिस्तानला वेगळे पाडल्यास याचे गंभीर परिणाम होतील. आणि ते अफगाण जनता, प्रदेश आणि जगासाठी उपयुक्त ठरणार नाही." आम्ही अफगाणिस्तानच्या संदर्भात नव्याने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे.

मानवतावादी संकटाकडे लक्ष देण्यास सांगितले

त्यांनी अफगाणिस्तानमधील मानवतावादी संकट रोखण्यावर जगाला लक्ष देण्याचे आवाहन केले असून देशासाठी निधी गोळा करण्यासाठी जिनिव्हा येथे एक परिषद आयोजित केली जात आहे, यावर त्यांनी समाधान व्यक्त केले (Pakistan Afghanistan Relations). ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारण्यासाठी योगदान देत आहे. तसेच 9 सप्टेंबर रोजी अन्न आणि वैद्यकीय साहित्य घेऊन जाणारे विमान अफगाणिस्तानला पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर हवाई आणि रस्तेमार्गाद्वारे आवश्यक ती मानवी मदत पाठवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

Shah Mahmood Qureshi
UNSC मध्ये अफगाणिस्तान ठरावावर मतदानासाठी चीन, रशियाची अनुपस्थित

निधी थांबवण्याच्या निर्णयावर विचार केला पाहिजे

कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला (International Community) अफगाणिस्तानला आर्थिक आघाडीवर अपयशी होण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्याची विनंती पुन्हा एकदा केली आहे. आणि त्यासाठी आवश्यक ती संसाधने प्रदान करुन आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येऊ शकते. ते पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानला जो निधी देण्यात येणार होता मात्र तो गोठवण्यात आल्याच्या निर्णयाचा विरोध यावेळी कुरेशी यांनी केला. तसेच या निर्णयावर पुन्हा एकदा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे देखील खंतही व्यक्त केली. स्पॅनिश परराष्ट्रमंत्र्यांनी अफगाण नागरिकांना मदत करण्यासाठी पाकिस्तान आणि इतर प्रादेशिक देशांशी एकत्रित येत काम करण्याची विनंती देखील यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, "पाकिस्तान आणि स्पेन दोघांनाही अफगाणिस्तानमध्ये स्थिरता आणि शांतता हवी आहे, आम्हाला अफगाण लोकांपर्यंत मानवीय मदत पोहोचवायची आहे."

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com