Saudi Arabia Floating City: समुद्रात कासवाच्या आकाराचे तरंगते शहर, होणार जगातील सर्वात मोठी तरंगती वसाहत

कासवाच्या आकाराच्या या तरंगत्या शहराला 'पायगिया' असे नाव देण्यात आले आहे.
Saudi Arabia Floating City
Saudi Arabia Floating CityDainik Gomantak

Saudi Arabia Floating City: आखाती देशांनी नेहमीच गगनचुंबी इमारती बांधून जगाला चकित केले आहे. आता समुद्रात देखील एक महाकाय शहर उभारण्याची तयारी सुरू आहे, या शहरात तब्बल 65,000 लोकांना राहता येणार आहे. सौदी अरेबियाने पँगोज नावाचे 5 अब्ज डॉलरचे, टेरा याच तयार करण्याची घोषणा केली आहे. हे शहर तयार करण्यासाठी $8 अब्ज (65,000 कोटी रुपये) खर्च येणार आहे. कासवाच्या आकाराच्या या तरंगत्या शहराला 'पायगिया' असे नाव देण्यात आले आहे.

(Pangeos: Saudi Arabia’s $8bn Turtle-shaped Floating City)

Saudi Arabia Floating City
Goa Corona Update: गोव्यात कोरोनाचा जोर ओसरला, सक्रिय रूग्ण संख्येत मोठी घट

काय आहेत या शहराची वैशिष्ट्ये?

- 'पायगिया' शहरात 64 अपार्टमेंट आणि 19 व्हिला असतील.

- शहराचा आकार कासवासारखा असेल आणि प्रत्येक पंखावर राहण्यासाठी घरे बांधली जाणार आहेत. हे तयार होण्यासाठी 8 वर्षे लागू शकतात.

- या तरंगत्या शहरात शॉपिंग मॉल्स, लहान जहाजांसाठी बंदर आणि प्रवाशांच्या वाहतूकीसाठी विमानसेवा देखील असेल. हॉटेल्स आणि पार्क्ससारख्या सुविधाही असतील.

- शहर पूर्ण झाल्यानंतर ही जगातील सर्वात मोठी तरंगणारी रचना असेल.

Saudi Arabia Floating City
Sanguem Eco Sensitive Zone: इको सेन्सिटिव्ह विभागातून सांगेतील गाव वगळा; जिल्हा पंचायत बैठकीत ठराव

- सौदी अरेबियाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना समुद्रात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शहरात 65,000 लोक राहू शकतात.

- शहराच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सुमारे 1 चौरस किलोमीटरमध्ये वर्तुळाकार धरण बांधले जाणार असल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com