पाकिस्तानात पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला, 4 पोलिसांचा मृत्यू

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिओ लसीकरण पथकाच्या सुरक्षेत गुंतलेल्या पोलिसांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.
Pakistan
Pakistan Dainik Gomantak

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये पोलिओ लसीकरण पथकाच्या सुरक्षेत गुंतलेल्या पोलिसांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात 4 पोलिसांचा मृत्यू झाला आहे, तर दोन पोलिस जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना टँक जिल्ह्यातील गुल इमान भागात घडली.

अज्ञात बंदूकधाऱ्यांनी घरोघरी पोलिओ लसीकरण मोहिमेत गुंतलेल्या पोलिस मोबाइल व्हॅनवर हल्ला केला. पोलिस आणि हल्लेखोरांमध्ये बराच वेळ गोळीबार सुरू होता, असे स्थानिक लोकांनी सांगितले. गोळीबारात जखमी झालेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, पोलिओ लसीकरण पथक घेऊन जात असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मात्र पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

Pakistan
Pakistan Flood: पाकिस्तानात महाप्रलय, 4 अब्ज डॉलरचं, लष्कराकडून बचावकार्य

या हल्ल्यानंतर घटनास्थळी घबराट पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे कोणालाच काही समजले नाही. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. आता या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

Pakistan
Pakistan Flood: पाकिस्तानात पूरग्रस्त हिंदू मुलीवर राशन देण्याच्या बहाण्याने बलात्कार

दरम्यान, पोलिसांवर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही दक्षिण वझिरीस्तानमधील आदिवासी जिल्ह्यातील लढा भागात पोलिओ मोहिमेत सहभागी असलेल्या टीमवर हल्ला करण्यात आला होता. सरकारकडून पोलिओ नष्ट करण्यासाठी अनेक भागात पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिओ विरोधी कार्यक्रमाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या मोहिमेचे उद्दिष्ट 37 लाखांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचे आहे. लसीकरण पथकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com