लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी पॅरिसमध्ये ट्राफिक जॅम

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

लॉकडाऊन परत सुरू होण्यापूर्वी काल पॅरिस शहरात शेकडो किलोमीटर रांगेची वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूकच कोंडी सुमारे 700 किलोमीटर पर्यंत पसरली होती.

पॅरिस : कोरोनाची परिस्थिती पुन्हा नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी फ्रान्समध्ये पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन परत सुरू होण्यापूर्वी काल पॅरिस शहरात शेकडो किलोमीटर रांगेची वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूकच कोंडी सुमारे 700 किलोमीटर पर्यंत पसरली होती.

बरेच लोक या शनिवार व रविवारच्या सुद्द्यांमुळे तसेच अखेरच्या ऑल सेंट्स डे ची सुट्टी असल्याने घराबाहेर पडले होते. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, आता आंतरदेशीय प्रवास करण्यास कडक बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे. फ्रान्सच्या इतर शहरांमध्येही लॅाकडाऊनची अंमलबजावणी होण्यापूर्वी हिच परिस्थिती होती.

संबंधित बातम्या