ट्रम्प यांना न्यायालयाचा निर्णय जिव्हारी लागला

दैनिक गोमन्तक
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पेनसिल्व्हानिया, राज्यातील निकालाविरोधात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखल केलेली आव्हान याचिका पेनसिल्व्हेनियाच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

वॉशिंग्टन: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत पेनसिल्व्हानिया, राज्यातील निकालाविरोधात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखल केलेली आव्हान याचिका पेनसिल्व्हेनियाच्या न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या खटल्यावरील कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम राखला आहे. 

निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास तयार नसलेल्या ट्रम्‍प यांना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ‘वकील नव्हे तर मतदार अध्यक्षांची निवड करतात, असे सांगत ट्रम्प यांनी निकालाला आव्हान दिले होते. फिलाडेल्फियातील तिसऱ्या न्यायालयातील तीन न्यायाधीशांच्या समितीपुढे शुक्रवारी सुनावणी झाली. ट्रम्प यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे मत समितीने नोंदविले आहे. मतदारांबरोबर धोका झाला असल्याचा ट्रम्प यांनी केला आहे. पेनसिल्व्हानियातील हा निकाल लागण्याच्या चार दिवस आधी या राज्यातून ज्यो बायडेन विजयी झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. 

ट्रम्प यांना पराभव जिव्हारी लागला आहेत. त्यामुळे निकालात बनवेगिरी झाल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी अमेरिकेतील अनेक राज्यातील निकालांविरोधात आव्हान दिले होते. पण त्यासंबंधीचे कोणतेही पुरावे त्यांनी दिले नव्हते. 

आणखी वाचा:

मुक्त न निष्पक्ष निवडणुका हे आमच्या लोकशाहीच्या रक्तात आहे. यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करणे गंभीर आहे, मात्र तसे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. आरोप हे अत्यंत स्पष्ट हवेत व दुसरे म्हणजे ते सिद्ध करण्यासाठी पुरावे असणे आवश्‍यक आहे. आम्हाला असे काहीही पुरविलेले नव्हते.
- स्टिफन्स बायबस, न्यायाधीश

संबंधित बातम्या