ज्येष्ठ नागरिकांसाठी फायझरची लस ठरणार प्रभावी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

अमेरिकेतील फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी विकसीत केलेली कोरोना विषाणूवरील लस वयाची ६५ वर्ष ओलांडलेल्या नागरिकांमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरते, असे चाचणीतून दिसून आले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी विकसीत केलेली कोरोना विषाणूवरील लस वयाची ६५ वर्ष ओलांडलेल्या नागरिकांमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरते, असे चाचणीतून दिसून आले आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु असून ही लस सर्व वयाच्या आणि वंशांच्या नागरिकांसाठी उपयुक्त असल्याचा दावाही कंपनीतर्फे केला जात आहे. जगभरातील ४१ हजार स्वयंसेवकांना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. 

संबंधित बातम्या