फायझर लसीचा शूक्राणूंवर कोणताही परिणाम नाही!

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

फायझर बायोयेनटेक आणि शूक्राणूंचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच अनेक देशांनी कोरोना लसीकरणालाही सुरुवात केली आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute) आणि भारत बायोटेकने (Bharat Biotech) बनवलेल्या अनुक्रमे कोविशील्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaccine) या लसींना मान्यता देण्यात आली आहे. याच पाश्वूमीवर फायझर बायोयेनटेकच्या (Pfizer Biontech) लसीकरणानंतर शुक्राणूंवर कोणताही परिणाम होत नसल्याचं इस्त्राईली अभ्यसकांनी सखोल संशोधनानंतर सांगितलं आहे. (Pfizer vaccine has no effect on sperm)

लसीकरणानंतर शुक्राणूंच्या संख्येत आणि त्यांच्या क्षमतेत कोणत्याही स्वरुपाचा बदल होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी 43 जणांचे शूक्राणूंचे नुमने घेतले होते. या 43 जणांनी महिन्याभरापूर्वी कोरोना लसीकरण केलं होतं. त्यामुळे आता फायझर बायोयेनटेक आणि शूक्राणूंचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

WHO ने 'मॉडर्ना' लसीला आपत्कालीन वापरासाठी दिली मंजूरी

इस्त्राईली अभ्यासकांनी शूक्राणूंची संख्या, घटक आणि त्यांची गतीशिलता यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचं या संशोधनतून पुढे आलं आहे. हा संपूर्ण अभ्यास मेडआरक्विझवर प्रकाशित करण्यात आला आहे. या अभ्यासानंतर जगभरातील युवकांचा गैरसमज दूर होणार आहे. त्यामुळे आता पुरुषांना लसीकरण करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर गर्भधारणेसाठी इच्छुक असलेली जोडपीही लसीकरण करु शकतात. कारण या लसीचा मानवी शूक्राणूंवर कोणताही परिणाम होत नाही, असं इस्त्राईली अभ्यासकांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता कोरोना लसीकरणाला वेग मिळणार आहे. मागील अभ्यासामध्ये कोरोनामुळे शूक्राणूंवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या