फायझरची मोठी घोषणा; 12 वर्षांखालील मुलांना दिले जाणार लसीचे डोस

Pfizers big announcement Vaccines to be given to children under 12 years of age
Pfizers big announcement Vaccines to be given to children under 12 years of age

जगभरात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. युरोपीयन देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. यामध्य़े फ्रान्स, जर्मनी या देशांचा समावेश होतो. कोरोनाला रोखण्याकरता अनेक लसनिर्मीती करणाऱ्या कंपन्यांनी लसींची निर्मीतीही केली आहे. भारत सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने बनवलेल्या लसींना मान्यता देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने गुरुवारपासून 12 वर्षांखालील लहान बालकांसाठी कोरोना लसीची चाचणी सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.

जागतिक लसीकरण मोहीमेतील पुढील टप्प्याची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फायझरने सहकारी कंपनी बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचं म्हटलं आहे. आमची सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने फायझर-बायोएनटेक कोवीड-19 लसीची सुरक्षा, सहनशीलता आणि रोगप्रतिकारकशक्ती संदर्भातील चाचणी करण्यासाठी जागतिक मोहिमेअंतर्गत अभ्यासादरम्यान निरोगी असणाऱ्या बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, असे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. (Pfizers big announcement Vaccines to be given to children under 12 years of age)

लहान मुलांवर लसीकरणासंदर्भात चाचण्य़ा सुरु करण्याचा आम्हाला अभिमान असल्याचे कंपनीने म्हटले आहे. लहान बालके आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकजण लहान मुलांना कोरोना लस देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. कंपनी लहान मुलांना कोरोनाची लस देण्यासाठी  तीन वेगवेगळ्य़ा प्रकारच्या लसींची निर्मीती करण्याच्या विचारात असून त्यासंदर्भातील चाचण्या सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

फायझर कंपनीने 12 ते 15 वयोगटातील लहान बालकांसाठी कोरोना प्रकिबंधक लसीची चाचणी सुरु करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने फायझरला आपत्कालीन वापरासाठी 16 वर्षं आणि त्यावरील व्यक्तींना कोरोनाची लस दे्ण्य़ासाठी परवानगी दिली आहे. लहान बालकांना कोरोना संसर्गाची शक्यता ही वयस्कर व्यक्तींपेक्षा कमी असली तरी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही. लहान मुलांना कोरोना संसर्गाचा अधिक त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लहान बालकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्याचा सल्ला अनेक आरोग्य तज्ञांनी दिला होता.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com