फिलिपाईन्सने भारतासह 9 देशांवरील प्रवासबंदी उठवली

तथापि, डेल्टा व्हेरिएंटबाधित (Delta variant) रुग्णांची संख्या फारशी कमी झालेली नाही.
फिलिपाईन्सने भारतासह 9 देशांवरील प्रवासबंदी उठवली
PhilippinesDainik Gomantak

जगभरात कोरोनाचे (Covid 19) नव नवे व्हेरिएंट आढळून येत असतानाच दुसरीकडे फिलिपाईन्सने भारतसह इतर नऊ देशांवर 6 सप्टेंबरपर्यंत लागू केलेले कोविड प्रतिबंध हटवले आहेत. फिलीपाईन्सच्या (Philippines) राष्ट्रपतींचे प्रवक्ते हॅरी रॉक (Harry Rock) यांनी म्हटले की, फिलिपिन्सने भारत (India) आणि इतर नऊ देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, डेल्टा व्हेरिएंटबाधित रुग्णांची संख्या फारशी कमी झालेली नाही.

फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, ओमान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियातील विद्यमान प्रवास निर्बंध उठवण्यासाठी आंतर-एजन्सी कोरोना टास्क फोर्सच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. रोके यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, वरील देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मात्र योग्य प्रवेश, कोरोना चाचणी अहवाल आणि विलगीकरण कक्षात ठेवणे या प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे.

Philippines
Corona Vaccine: भारताच्या कोवॅक्सिनला लवकरच मिळणार WHO ची संमत्ती

फिलिपिन्स मध्ये डेल्टा व्हेरिएंटचा कहर

तथापि, राजनयिक अधिकारी आणि विशेष व्हिसा धारक वगळता अजूनही परदेशी पर्यटकांना देशात प्रवेश करण्यास बंदी आहे. डेल्टा व्हेरिएंटचा (Delta variant) प्रसार अधिक गतीने फिलिपाईन्समध्ये होत आहे. देशात 33 मृत्यूंसह 1,789 डेल्टाचे रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटच्या सामुदायिक प्रसाराची पुष्टी करण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, फिलिपाईन्सला कोरोनाचा संसर्गाचा धोका येणाऱ्या काळात मोठ्याप्रमाणात संभवत आहे.

Philippines
corona virus : वुहानच्या लॅबमधूनच पसरला का ? जगभरातून पुन्हा शंका व्यक्त

फिलिपिन्समध्ये कोरोनाची परिस्थिती

एप्रिलमध्ये फिलिपाईन्सने भारतातून येणाऱ्या प्रवाशांना रोख लावला होता. आणि नंतर डेल्टा रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा इतर नऊ देशांचा समावेश केला होता. फिलिपाईन्स आता वाढत्या कोरोना संसर्गाशी झुंज देत आहे. आग्नेय आशियाई देशात शुक्रवारपर्यंत एकूण 2,040,568 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ज्यात 33,873 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com