PM Anthony Albanese: भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान काय म्हणाले वाचा...

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
PM Anthony Albanese:
PM Anthony Albanese:Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अल्बानीज बुधवारी संध्याकाळी गुजरातच्या अहमदाबादमध्ये दाखल झाले. त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी साबरमती आश्रमाला भेट दिली. याचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी यांचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत लिहिले की "अहमदाबाद येथे एक अविश्वसनीय स्वागत करण्यात आले. ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांसाठी एक महत्त्वपूर्ण सहलीची सुरुवात झाली आहे,"

गुजरातमधील एका कार्यक्रमात त्यांनी एक भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली की ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटी गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटी येथे आपली शाखा स्थापन करणार आहे. ऑस्ट्रेलिया-भारत शिक्षा योग्यता मान्यता तंत्र' याला मान्यता दिली आहे.' असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले.

तत्पूर्वी, पंतप्रधानांनी त्यांच्या भारत भेटीला सुरुवात करताना, त्यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय डायस्पोराचे कौतुक केले की वैविध्यपूर्ण भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायामुळे ऑस्ट्रेलिया हे एक चांगले ठिकाण आहे.

अल्बानीज यांनी अहमदाब येथे होळीचा आनंद लुटला. अल्बानीज यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली.

अधिकृत वेळापत्रकानुसार, अल्बानीज होळीच्या निमित्ताने गांधीनगर येथील राजभवनात गुजरात सरकारने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतील. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि इतर मान्यवर सहभागी होतील.

आज अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान मोदी (PM Modi) ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहे. नंतर अल्बानीज मुंबईला रवाना होतील. शुक्रवारी, ते राष्ट्रपती भवनातील सेरेमोनियल रिसेप्शनमध्ये भाग घेण्यासाठी नवी दिल्लीत असतील आणि त्यानंतर राजघाट येथे पुष्पहार अर्पण समारंभ होईल, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतील. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये ते पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.

अल्बानीज यांच्या चार दिवसांच्या भारत भेटीदरम्यान पहिली वैयक्तिक भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद होणार आहे. वार्षिक शिखर परिषदेत, नेते भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत विविध उपक्रमांवरील प्रगतीचा आढावा घेतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com