PM Modi Video: 'द बॉस' मोदींचा जलवा पाहून पाकिस्तानला भरली धडकी, ड्रॅगनची 'बोलती बंद'!

PM Modi Australia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा जगभरात पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोदींकडे ऑटोग्राफ मागितला.
PM Modi & Anthony Albanese
PM Modi & Anthony AlbaneseDainik Gomantak

PM Modi Australia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जलवा जगभरात पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोदींकडे ऑटोग्राफ मागितला. त्याचवेळी, पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला.

आता ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचं साक्षात दर्शन झालं. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्यांना 'द बॉस' म्हटले. या सर्व कारणांमुळे भारताच्या एका शेजाऱ्याची बोलती बंद झाली तर दुसऱ्याला धडकी भरली आहे.

'डॉन'ने चीनचा मुद्दा उपस्थित केला

पाकिस्तानच्या (Pakistan) आघाडीच्या वृत्तपत्र 'डॉन'ने आपल्या पहिल्या पेजवर भारतात होणाऱ्या जी-20 बैठकीबाबत चर्चा केली आहे. पाकिस्तानने पुन्हा डॉयलॉग सुरु करण्याचा भारताचा प्रस्ताव फेटाळल्याचा दावा केला. पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीका करताना 'डॉन'ने आपल्या संपादकीय पेजवर 'फॅसिझमचे समर्थक' असे लिहिले.

या लेखात ऑस्ट्रेलियातील मूठभर लोकांचे समर्थन आणि खलिस्तानी प्रचार करणाऱ्यांना अतिशयोक्ती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लेखात रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या तटस्थतेचे वर्णन 'मौन' असे करण्यात आले आहे.

PM Modi & Anthony Albanese
PM Modi: ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातही पीएम मोदींचा डंका; फ्रंट पेजवर मोदींना स्थान...

तसेच, पंतप्रधान मोदींची स्तुती करणाऱ्या पाश्चात्य देशांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पाश्चात्य देशांनी जाणूनबुजून पंतप्रधान मोदींकडे डोळेझाक केली आहे. त्यांचे नेते त्यांना आलिंगन देत आहेत, असा आरोप या लेखात करण्यात आला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे लेखक माहिर अली यांनी म्हटले.

'डॉन'ने स्वतःच्या बातमीत लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियन पीएम अँथनी अल्बानीज यांची एक मजबूरी आहे की, त्यांना चीनशी स्पर्धा करावी लागेल. यासाठी ते पीएम मोदींचे 'रॉकस्टार वेलकम' करत आहेत.

G20 निष्रभ

पाकिस्तानचे दुसरे प्रमुख वृत्तपत्र 'द ट्रिब्यून' ने श्रीनगरमध्ये होत असलेल्या G20 बैठकीवर ताशेरे ओढले. वृत्तपत्राने G20 बैठकीत तुर्की, चीन आणि सौदी अरेबियाच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित केला.

'G20 Hua G17' या त्यांच्या संपादकीयाचे शीर्षक आहे. या वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यार अप्रत्यक्षपणे टीका केली. 'ऑस्ट्रेलियाने मोदींचे स्वागत 'द बॉस' मोदी' म्हणून केले.

PM Modi & Anthony Albanese
PM Modi पुन्हा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते, 78 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह मारली बाजी!

चीनने मौन बाळगले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चीनचे (China) अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स आणि चायना डेली यांनी मौन बाळगले आहे. चायना डेलीने G7 परिषदेवर टीका केली असली तरी भारताबाबत काहीही उल्लेख केला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com