
Prime Minister Narendra Modi: सर्वाधिक लोकप्रिय नेत्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नंबर-1 ठरले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 76 टक्के अप्रूव्हल रेटिंगसह जगभरातील नेत्यांमध्ये अव्वल स्थानावर आहेत.
यूएस स्थित कन्सल्टन्सी फर्मच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरनुसार, 76 टक्के लोक पीएम मोदींच्या नेतृत्वाला मान्यता देतात, तर 18 टक्के लोक यास सहमत नाहीत आणि 6 टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नाही.
दरम्यान, डिसिजन इंटेलीजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने जारी केलेल्या यादीत स्विस राष्ट्राध्यक्ष एलेन बर्सेट पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 64 टक्के अप्रूव्हल रेटिंग मिळाले आहे.
यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस दा सिल्वा हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सातव्या क्रमांकावर आहेत. जगभरातील 22 नेत्यांवर ग्लोबल लीडर अप्रूव्हल सर्व्हे करण्यात आला होता.
यापूर्वी, जून 2023 मध्ये, पंतप्रधान मोदींना जागतिक नेत्यांच्या अप्रूव्हल रेटिंगमध्ये 78 टक्के मान्यता मिळाली होती, जी या वेळेपेक्षा 2 टक्के अधिक आहे. मात्र, त्यावेळीही पंतप्रधान मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.
गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान मोदी या यादीत अव्वल स्थानावर आहेत. नरेंद्र मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंग जगातील सर्वात कमी आहे.
या पाहणीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पीएम मोदींचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, जगभरातील नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अतुलनीय आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.