Sri Lanka: PM मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पाठवले पत्र, 'एकत्र काम करण्यास उत्सुक'

Sri Lanka Crisis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे अभिनंदन केले आहे.
Prime Minister Narendra Modi & Ranil Wickremesinghe
Prime Minister Narendra Modi & Ranil WickremesingheDainik Gomantak

PM Modi Congratulates Ranil Wickremesinghe: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी रनिल विक्रमसिंघे यांना त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनपर पत्र पाठवले आहे. प्रस्थापित लोकशाही मार्गाने स्थिरता आणि आर्थिक पुनरुत्थानासाठी भारत श्रीलंकन ​​जनतेला पाठिंबा देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्यासाठी राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे देखील पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, आर्थिक संकटाच्या पाश्वभूमीवर, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला. श्रीलंकेच्या संसदेने बुधवारी राजपक्षे यांचे सहकारी आणि माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची राजपक्षे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली. सिंगापूरला (Singapore) पोहोचल्यानंतर गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिला. श्रीलंकेच्या (Sri Lanka) संसदेने थेट राष्ट्रपतींची निवड करण्याची 44 वर्षांतील ही पहिलीच वेळ होती.

Prime Minister Narendra Modi & Ranil Wickremesinghe
Schools Reopen in Sri Lanka : इंधनाअभावी बंद करण्यात आलेल्या श्रीलंकेतील शाळा अखेर पुन्हा सुरू

श्रीलंकेच्या संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले

गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पळ काढल्यानंतर विक्रमसिंघे यांनी 17 जुलै रोजी आणीबाणी जाहीर केली. श्रीलंकन ​​संसदेचे नवे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्या नियुक्तीनंतरचे पहिले अधिवेशन बुधवारी बोलावण्यात आले आहे. या दरम्यान नवे अध्यक्ष आठवडाभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला मंजुरी देऊ शकतात.

Prime Minister Narendra Modi & Ranil Wickremesinghe
Sri Lanka: PM मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पाठवले पत्र, 'एकत्र काम करण्यास उत्सुक'

अनेक महिन्यांपासून देशात अशांतता आहे

श्रीलंकन कायद्यासंदर्भात, आणीबाणी लागू झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत संसदेने मंजूरी देणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या (Emergency) काळात पोलिसांना आणि सैन्याला अधिक अधिकार मिळतात. ज्यामध्ये ते संशयित व्यक्तींना अटक करु शकतात, त्याचबरोबर त्यांना ताब्यात घेऊ शकतात. शिवाय, खाजगी मालमत्तेचा शोध घेण्याचा देखील अधिकार त्यांना प्राप्त होतो. श्रीलंका आर्थिक संकटाच्या भीषण टप्प्यातून जात असताना, गेल्या अनेक महिन्यांपासून देशात अशांतता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com